S M L

दिल्लीतील इमारत कोसळली 65 जणांचा मृत्यू

16 नोव्हेंबरदिल्लीत बांधकाम सुरू असलेली बिल्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या आता 65 वर गेली आहे. तर 80 जखमी झाले आहे. ढिगार्‍याखाली अनेक जण गाडले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरु आहे. जखमींना जवळच्या लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतल्या लक्ष्मीनगरात ही घटना घडली. ही इमारत बांधून 15 वर्ष झाली. या बिल्डींगवर अनधिकृतपणे पाचवा मजला बांधण्यात येत होता. राज्य सरकारने या अगोदरच बिल्डींगचे मालक अमृत सिंग याच्याविरुध्द मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना सर्व मोफत उपचार करुन दिले जातील अशी घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 10:47 AM IST

दिल्लीतील इमारत कोसळली 65 जणांचा मृत्यू

16 नोव्हेंबर

दिल्लीत बांधकाम सुरू असलेली बिल्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या आता 65 वर गेली आहे. तर 80 जखमी झाले आहे.

ढिगार्‍याखाली अनेक जण गाडले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरु आहे. जखमींना जवळच्या लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतल्या लक्ष्मीनगरात ही घटना घडली. ही इमारत बांधून 15 वर्ष झाली. या बिल्डींगवर अनधिकृतपणे पाचवा मजला बांधण्यात येत होता.

राज्य सरकारने या अगोदरच बिल्डींगचे मालक अमृत सिंग याच्याविरुध्द मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना सर्व मोफत उपचार करुन दिले जातील अशी घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close