S M L

सोलापुरात बारमध्ये आरपीएफ जवानांचा राडा

16 नोव्हेंबरसोलापुरातील पिनॅक बारमध्ये तीन आरपीएफ जवानांनी सोमवारी रात्री राडा केला. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नव्हता. सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पिनॅक बारमध्ये रेल्वे पोलिस फोर्समधील जवान जी.एम. पाटील आणि त्याचे इतर दोन सहकारी मद्य प्राशन करत बसले होते. दुपारी साडेतीन वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत त्यांचं पिणं सुरुच होतं. त्यानंतर वेटरने बिल मागितले असता त्यांनी बिल न देता बारमधल्या कर्मचार्‍यांनाच शिव्या द्यायला सुरुवात केली. तसेच बारमध्ये बिअरच्या बाटल्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बारच्या व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधल्याचे निदर्शनास येताच पाटील याचे इतर दोन साथीदार पळून गेले तर पाटील यास पकडण्यात यश आले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 08:12 AM IST

सोलापुरात बारमध्ये आरपीएफ जवानांचा राडा

16 नोव्हेंबर

सोलापुरातील पिनॅक बारमध्ये तीन आरपीएफ जवानांनी सोमवारी रात्री राडा केला. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नव्हता.

सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पिनॅक बारमध्ये रेल्वे पोलिस फोर्समधील जवान जी.एम. पाटील आणि त्याचे इतर दोन सहकारी मद्य प्राशन करत बसले होते.

दुपारी साडेतीन वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत त्यांचं पिणं सुरुच होतं. त्यानंतर वेटरने बिल मागितले असता त्यांनी बिल न देता बारमधल्या कर्मचार्‍यांनाच शिव्या द्यायला सुरुवात केली.

तसेच बारमध्ये बिअरच्या बाटल्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बारच्या व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधल्याचे निदर्शनास येताच पाटील याचे इतर दोन साथीदार पळून गेले तर पाटील यास पकडण्यात यश आले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close