S M L

गोवंडीत हॉस्पीटलच्या हद्दीतून मूल पळवले

16 नोव्हेंबरगोवंडीतल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमधून मूल पळवल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये औषधासाठी मुन्नी खातू आपल्या तीन मुलांसोबत गेली होती.त्यावेळी तिने आपले दोन महिन्याचे तान्हं बाळ मोठ्या मुलाजवळ दिले आणि ती औषध घ्यायला गेली. तितक्यात एका बुरखाधारी महिलेने ते मुल पळवले. त्या महिलेने बुरखा घातला असल्यामुळे तिचा चेहरा कुणीच पाहिला नाही. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सध्या तरी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 07:32 AM IST

गोवंडीत हॉस्पीटलच्या हद्दीतून मूल पळवले

16 नोव्हेंबर

गोवंडीतल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमधून मूल पळवल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये औषधासाठी मुन्नी खातू आपल्या तीन मुलांसोबत गेली होती.

त्यावेळी तिने आपले दोन महिन्याचे तान्हं बाळ मोठ्या मुलाजवळ दिले आणि ती औषध घ्यायला गेली. तितक्यात एका बुरखाधारी महिलेने ते मुल पळवले.

त्या महिलेने बुरखा घातला असल्यामुळे तिचा चेहरा कुणीच पाहिला नाही. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सध्या तरी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 07:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close