S M L

दिवाळीमध्ये स्वस्त हॉटेल्सना खवय्यांची पहिली पसंती

30 ऑक्टोबर, अहमदाबादमनीष देसाईमहागाईमुळे मोठ्या हॉटेल्सचा धंदा मंदावला आहे पण या मोठ्या ऐशआरामी हॉटेल्सऐवजी बजेट आणि इकॉनॉमी हॉटेल्सची कमाई सध्या पाचपटीनं वाढली आहे. 2007-08 मध्ये गुजरातमध्ये चार आणि पंचतारांकिंत हॉटेल्सच्या 61 टक्के रुम्सना बुकिंग मिळालं,पण याचवेळेला थ्री स्टार आणि बजेट हॉटेलमध्ये मात्र 80 टक्के बुकिंग झालं होतं. कॉस्ट कटिंगसाठी कॉर्पोरेट्स आणि इतर बिझनेसमनदेखील बजेट हॉटेलांकडे वळले आहेत.बजेट हॉटेलांमध्ये लक्झरी हॉटेल्सपेक्षा सोयीसुविधा कमी असतात, पण तसाच त्यांच्या दरांमध्येही फरक असतो. दिल्लीत फोर स्टार हॉटेलच्या रुमचं किमान भाडं असतं साडे तेराहजार रुपये तर अशीच रुम थ्री स्टार हॉटेलमध्ये चार ते पाच हजारांना मिळते. बंगळूरूमध्ये फोर स्टार हॉटेलच्या रुममध्ये राहण्यासाठी मोजावे लागतात 8 ते 12 हजार रुपये पण बजेट हॉटेलमध्ये मात्र एका रुमसाठी 2500 ते 4300 रुपये द्यावे लागतात. सूरतमध्येही फोरस्टार हॉटेलच्या रुमचा दर साडेतीन ते साडेसहा हजार रुपये आहे आणि तिथं बजेट हॉटेलच्या रुमसाठी दर आहे फक्त आठशे रुपये. दरांमधला हाच फरक बजेट हॉटेल्सची गर्दी वाढवत आहे.जागतिक मंदीमुळे मोठ्या हॉटेलांची चमक सध्या जरी कमी झालीय, असं दिसतंय. मात्र महागाई कमी झाल्यावर बिझनेस क्लास आणि इतर प्रवासी पुन्हा लक्झरी हॉटेलांकडे वळतील, अशीच आशा ही मोठी हॉटेल्स करत असतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 11:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close