S M L

नाशिकमध्ये द्राक्षबागांवर कुर्‍हाड

कपिल भास्कर, नाशिक17 नोव्हेंबरअवकाळी झालेल्या पावसाचा कहरात आता शेतकर्‍यांचा बळी जात आहे. नाशिकला सुबत्ता मिळवून देणार्‍या द्राक्षबागा सध्या संकटात सापडल्या आहेत. पावसाने झालेल्या नुकसानाला वैतागून नाशिकचे शेतकरी द्राक्षबागा तोडून टाकायला लागले आहे. यात शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.मखमलाबादच्या बाळासाहेब काकडांनी 4 वर्षांपूर्वी कर्ज काढून द्राक्ष बाग केली. पण यंदा पिकलेली द्राक्षं तोडण्याऐवजी त्यांच्यावर द्राक्षाच्या बाग तोडून टाकण्याची वेळ आली. गेल्या तीन वर्षांपासून नाशिकच्या द्राक्षबागांना अस्मानी संकटाचा फटका बसतोय. गेल्या वर्षी गारपिटीचा फटका बसला आणि सरकारच्या बेजबाबदारपणामुळे निर्यातीवर गदा आली आणि आता बाग ऐन बहरात असताना पावसाचा मारा झाला.तसेच चार एकरासाठी 12 लाख रुपयांचं नुकसान सोसावे लागते गेल्या वेळी पंचनामे झाले पण हातात काहीच पडलं नाही. नव्या मुख्यमंत्र्यांनीही आमची निराशाचं केली, असं द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 03:04 PM IST

नाशिकमध्ये द्राक्षबागांवर कुर्‍हाड

कपिल भास्कर, नाशिक

17 नोव्हेंबर

अवकाळी झालेल्या पावसाचा कहरात आता शेतकर्‍यांचा बळी जात आहे. नाशिकला सुबत्ता मिळवून देणार्‍या द्राक्षबागा सध्या संकटात सापडल्या आहेत.

पावसाने झालेल्या नुकसानाला वैतागून नाशिकचे शेतकरी द्राक्षबागा तोडून टाकायला लागले आहे. यात शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

मखमलाबादच्या बाळासाहेब काकडांनी 4 वर्षांपूर्वी कर्ज काढून द्राक्ष बाग केली. पण यंदा पिकलेली द्राक्षं तोडण्याऐवजी त्यांच्यावर द्राक्षाच्या बाग तोडून टाकण्याची वेळ आली.

गेल्या तीन वर्षांपासून नाशिकच्या द्राक्षबागांना अस्मानी संकटाचा फटका बसतोय.

गेल्या वर्षी गारपिटीचा फटका बसला आणि सरकारच्या बेजबाबदारपणामुळे निर्यातीवर गदा आली आणि आता बाग ऐन बहरात असताना पावसाचा मारा झाला.

तसेच चार एकरासाठी 12 लाख रुपयांचं नुकसान सोसावे लागते गेल्या वेळी पंचनामे झाले पण हातात काहीच पडलं नाही. नव्या मुख्यमंत्र्यांनीही आमची निराशाचं केली, असं द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close