S M L

रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे 14 रूग्ण दगावले

18 नोव्हेंबररायगडमध्ये लेप्टोस्पायरोसिसने धुमाकुळ घातला आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या चोळे, शिहू,बेनसे,रावे,गडप या गावातल्या 14 शेतकर्‍यांचा लेप्टोस्पायरसिसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा 33 वर पोहचला. सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रोग फोफावतोय असा आरोप गावकरी करत आहे. जिल्ह्यात दररोज लेप्टोस्पायरसिसचे 15 ते 20 संशयीत रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. रायगडप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लेप्टोस्पायरेसिसने आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे लेप्टोने घेतलेल्या बळींची संख्या आता 10 झाली. कणकवली तालुक्यातली 20 गावं लेप्टोबाधीत म्हणून घोषीत करण्यात आली असून रक्त तपासणीत लेप्टो बाधीत असलेल्या रुग्णांची संख्या 40 वर गेली. तालुक्यात आरोग्य पथके कार्यरत असली तरीही जिल्ह्यात आवश्यक असलेली प्लेटलेट सेपरेटर यंत्रणा कार्यानिवीत होण्यास आणखी चार महीने लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आहे. अनेक खाजगी रुग्णालयात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढती असून कणकवलीच्या सरकारी रुग्णालयात सध्या 40 हून जास्त तापाचे पेशंट्स उपचार घेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 09:33 AM IST

रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे 14 रूग्ण दगावले

18 नोव्हेंबर

रायगडमध्ये लेप्टोस्पायरोसिसने धुमाकुळ घातला आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या चोळे, शिहू,बेनसे,रावे,गडप या गावातल्या 14 शेतकर्‍यांचा लेप्टोस्पायरसिसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा 33 वर पोहचला.

सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रोग फोफावतोय असा आरोप गावकरी करत आहे. जिल्ह्यात दररोज लेप्टोस्पायरसिसचे 15 ते 20 संशयीत रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. रायगडप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लेप्टोस्पायरेसिसने आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे लेप्टोने घेतलेल्या बळींची संख्या आता 10 झाली.

कणकवली तालुक्यातली 20 गावं लेप्टोबाधीत म्हणून घोषीत करण्यात आली असून रक्त तपासणीत लेप्टो बाधीत असलेल्या रुग्णांची संख्या 40 वर गेली. तालुक्यात आरोग्य पथके कार्यरत असली तरीही जिल्ह्यात आवश्यक असलेली प्लेटलेट सेपरेटर यंत्रणा कार्यानिवीत होण्यास आणखी चार महीने लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आहे. अनेक खाजगी रुग्णालयात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढती असून कणकवलीच्या सरकारी रुग्णालयात सध्या 40 हून जास्त तापाचे पेशंट्स उपचार घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close