S M L

रोईंगमध्ये दोन सिल्व्हर पदकांची कमाई

18 नोव्हेंबरचीन येथे सुरु असलेल्या 16 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी समाधानकारक ठरला. आज दिवसभरात भारताने रोईंगमध्ये दोन सिल्व्हर , आणि शुटींग एक ब्राँझ पदक पटकावले आहे. या पदकासह भारताच्या खात्यात 1 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 8 ब्राँझ पदकांची नोंद झाली आहे. भारताच्या खात्यात एकूण 16 पदक जमा झाले आहेत.रोईंगमध्ये ऐतिहासिक कामगिरीलाईटवेट रोईंग टीम प्रकारातही भारताने दुसरं सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. लोकेश कुमार, मनदीत सिंग, राजेश कुमार यादव आणि सतिश जोशी यांनी ही कामगिरी केली. जपाननं यामध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. संपूर्ण स्पर्धेत तीनही टीममध्ये अटीतटीची लढत होती. पण शेवटच्या क्षणाला जपानने बाजी मारली आणि भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानायला लागलं.सानिया मिर्झाची विजयी सलामीमहिला टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं विजयी सलामी दिली आहे. महिला सिंग्ल्समध्ये सानियानं आपली पहिली मॅच सहज जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. सानियानं हाँगकाँगच्या विंग यु चॅनचा पराभव केला. ही मॅच सानियानं 6-1 आणि 6-0 अशी फक्त 50 मिनिटात जिंकली. सानियानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. शुटींगमध्ये ब्राँझ पदकाने सुरुवातआशियाई स्पर्धेत अखेर शुटींगमध्ये भारताला चांगली बातमी आली आहे. भारताच्या विजय कुमारने पुरूषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं विजयचं हे दुसरं मेडल आहे. याआधी पुरूषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात विजय कुमारने ब्राँझ पटकावलं होतं.अमनदीपची क्वार्टर फायनलमध्ये धडकआशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आजचा दिवस चांगला राहीला. सुपर हेविवेट गटात परमजीत समोटाने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताचं मेडल पक्क केलं. समोटाने कोरियाच्या सुनकोन पार्कचा 9-4ने पराभव केला. दुसरीकडे पुरूषांच्या 52 किलो वजनी गटात सुरंजॉयने विजय मिळवत पुढच्या फेरित प्रवेश केला. सुरंजॉयने कोरियाच्या जुसाँग किमचा 8-6ने पराभव केला. तर 46 किलो वजनी गटातही भारताच्या अमनदिपने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला अमनदिपने सौदी अरेबियाच्या फहाद अलफैफीचा पराभव केला.बॅडमिंटनमध्ये निराशाजनक बॅडमिंटनमध्ये मात्र भारताची निराशाजनक कामगिरी झाली आहे. मिक्स डबल्समध्ये ज्वाला गुट्टा आणि व्हि. डीजू जोडीला क्वार्टरफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. दक्षिण कोरियाच्या बेकचोले शीन आणि होजंग लीने त्यांचा 21-17, 13-21 आणि 16-21 असा पराभव केला. पुरूषांच्या एकेरीतही अरविंद भटला दुसर्‍या फेरित पराभवाला सामोरं जावं लागलं. थायलंडच्या बुनसाकने त्याचा 19-21, 12-21 असा पराभव केला. तायक्वांडोमध्ये घौडदौड सुरुचतायक्वांडोमध्ये शांतीबाला देवीने आपली क्वार्टर फायनल मॅच जिंकली. 57 किलो वजनी गटात शांतीबालाने भुतानच्या केझांग लामोचा पराभव केला. पहिल्या राऊंडमध्ये शांतीबालाने 4 पाँईंट्सची कमाई केली आणि त्यानंतर तिसर्‍या राऊंडमध्ये अजुन 3 पाँईंट्स पटकावत 7-0ने मॅचवर कब्जा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 02:52 PM IST

रोईंगमध्ये दोन सिल्व्हर पदकांची कमाई

18 नोव्हेंबर

चीन येथे सुरु असलेल्या 16 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी समाधानकारक ठरला. आज दिवसभरात भारताने रोईंगमध्ये दोन सिल्व्हर , आणि शुटींग एक ब्राँझ पदक पटकावले आहे. या पदकासह भारताच्या खात्यात 1 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 8 ब्राँझ पदकांची नोंद झाली आहे. भारताच्या खात्यात एकूण 16 पदक जमा झाले आहेत.

रोईंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी

लाईटवेट रोईंग टीम प्रकारातही भारताने दुसरं सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. लोकेश कुमार, मनदीत सिंग, राजेश कुमार यादव आणि सतिश जोशी यांनी ही कामगिरी केली. जपाननं यामध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. संपूर्ण स्पर्धेत तीनही टीममध्ये अटीतटीची लढत होती. पण शेवटच्या क्षणाला जपानने बाजी मारली आणि भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानायला लागलं.

सानिया मिर्झाची विजयी सलामी

महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं विजयी सलामी दिली आहे. महिला सिंग्ल्समध्ये सानियानं आपली पहिली मॅच सहज जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. सानियानं हाँगकाँगच्या विंग यु चॅनचा पराभव केला. ही मॅच सानियानं 6-1 आणि 6-0 अशी फक्त 50 मिनिटात जिंकली. सानियानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.

शुटींगमध्ये ब्राँझ पदकाने सुरुवात

आशियाई स्पर्धेत अखेर शुटींगमध्ये भारताला चांगली बातमी आली आहे. भारताच्या विजय कुमारने पुरूषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं विजयचं हे दुसरं मेडल आहे. याआधी पुरूषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात विजय कुमारने ब्राँझ पटकावलं होतं.

अमनदीपची क्वार्टर फायनलमध्ये धडक

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आजचा दिवस चांगला राहीला. सुपर हेविवेट गटात परमजीत समोटाने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताचं मेडल पक्क केलं. समोटाने कोरियाच्या सुनकोन पार्कचा 9-4ने पराभव केला. दुसरीकडे पुरूषांच्या 52 किलो वजनी गटात सुरंजॉयने विजय मिळवत पुढच्या फेरित प्रवेश केला. सुरंजॉयने कोरियाच्या जुसाँग किमचा 8-6ने पराभव केला. तर 46 किलो वजनी गटातही भारताच्या अमनदिपने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला अमनदिपने सौदी अरेबियाच्या फहाद अलफैफीचा पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये निराशाजनक

बॅडमिंटनमध्ये मात्र भारताची निराशाजनक कामगिरी झाली आहे. मिक्स डबल्समध्ये ज्वाला गुट्टा आणि व्हि. डीजू जोडीला क्वार्टरफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. दक्षिण कोरियाच्या बेकचोले शीन आणि होजंग लीने त्यांचा 21-17, 13-21 आणि 16-21 असा पराभव केला. पुरूषांच्या एकेरीतही अरविंद भटला दुसर्‍या फेरित पराभवाला सामोरं जावं लागलं. थायलंडच्या बुनसाकने त्याचा 19-21, 12-21 असा पराभव केला.

तायक्वांडोमध्ये घौडदौड सुरुच

तायक्वांडोमध्ये शांतीबाला देवीने आपली क्वार्टर फायनल मॅच जिंकली. 57 किलो वजनी गटात शांतीबालाने भुतानच्या केझांग लामोचा पराभव केला. पहिल्या राऊंडमध्ये शांतीबालाने 4 पाँईंट्सची कमाई केली आणि त्यानंतर तिसर्‍या राऊंडमध्ये अजुन 3 पाँईंट्स पटकावत 7-0ने मॅचवर कब्जा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close