S M L

लेप्टोस्पायरोसिसकडे प्रशासनाच दुर्लक्ष

विनय म्हात्रे, रायगड20 नोव्हेंबरसिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये लेप्टोस्पायरोसिसनं थैमान घातलं आहे. लेप्टोस्पायरसिसमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या शेतकर्‍यांना याची लागण झाली. यामुळे पेण तालुक्यात 14 जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याचा फैलाव वाढत आहे. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. एकोणवीस वर्षाच्या शर्मिलाचा पती लेप्टोस्पायरोसिसनं दगावला. वेळेवर उपचार मिळाला नसल्यानं तिच्या पतीचा मृत्यू झाला. शर्मिलाच्या पदरात एक अडीच वर्षाची मुलगी आहे. आता तिच्या भविष्याचं काय ही चिंता तिला सतावत आहे.चोळे, शाहू, बेनसे, गडब, रावे या गावात लेप्टोस्पायरोसिसनं थैमान घातलं आहे. या प्रत्येक गावांवर शोककळा पसरली. आतापर्यंत इथं 160 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 75 जणांना याची लागण झाल्याचं निदान झालं आहे. या रुग्णांमध्ये दररोज 15 ते 20 जणांची भर पडत आहे.वेगानं फैलावणार्‍या या आजाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही, असा आरोप ग्रामपंचायतीनं केला आहे. आधीच पावसानं उभं असलेलं सगळं पीक आडवं झालं, त्या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही, तोच आता त्याला लेप्टोस्पायरोसिसचा विळखा बसू लागला आहे. या संकटातून सरकारनं त्यांना वेळीच बाहेर काढणार का, असा सवाल आता इथले ग्रामस्थ विचारत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 08:52 AM IST

लेप्टोस्पायरोसिसकडे प्रशासनाच दुर्लक्ष

विनय म्हात्रे, रायगड

20 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये लेप्टोस्पायरोसिसनं थैमान घातलं आहे. लेप्टोस्पायरसिसमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या शेतकर्‍यांना याची लागण झाली. यामुळे पेण तालुक्यात 14 जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याचा फैलाव वाढत आहे. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

एकोणवीस वर्षाच्या शर्मिलाचा पती लेप्टोस्पायरोसिसनं दगावला. वेळेवर उपचार मिळाला नसल्यानं तिच्या पतीचा मृत्यू झाला. शर्मिलाच्या पदरात एक अडीच वर्षाची मुलगी आहे. आता तिच्या भविष्याचं काय ही चिंता तिला सतावत आहे.

चोळे, शाहू, बेनसे, गडब, रावे या गावात लेप्टोस्पायरोसिसनं थैमान घातलं आहे. या प्रत्येक गावांवर शोककळा पसरली. आतापर्यंत इथं 160 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 75 जणांना याची लागण झाल्याचं निदान झालं आहे. या रुग्णांमध्ये दररोज 15 ते 20 जणांची भर पडत आहे.

वेगानं फैलावणार्‍या या आजाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही, असा आरोप ग्रामपंचायतीनं केला आहे. आधीच पावसानं उभं असलेलं सगळं पीक आडवं झालं, त्या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही, तोच आता त्याला लेप्टोस्पायरोसिसचा विळखा बसू लागला आहे. या संकटातून सरकारनं त्यांना वेळीच बाहेर काढणार का, असा सवाल आता इथले ग्रामस्थ विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 08:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close