S M L

हवालदाराने युवकाला बेदम मारले

20 नोव्हेंबरभिवंडीच्या शांतीनगरमध्ये पोलिस हवालदार हबींरराव काळे यांनी एका युवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजीविक्री करणार्‍या नितीन रणदिवे असे या युवकाचे नाव आहे. ड्युटीवर नसताना हबींरराव काळे यांनी नितीनला बेदम मारहाण केली. पण तिथे जमलेल्या लोकांनी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतली. पण नितीनचं या हवालदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर या मारहाणीत जखमी झालेल्या नितीनवर सध्या भिवंडीच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघंही दारु प्याययल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 03:40 PM IST

हवालदाराने युवकाला बेदम मारले

20 नोव्हेंबर

भिवंडीच्या शांतीनगरमध्ये पोलिस हवालदार हबींरराव काळे यांनी एका युवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजीविक्री करणार्‍या नितीन रणदिवे असे या युवकाचे नाव आहे.

ड्युटीवर नसताना हबींरराव काळे यांनी नितीनला बेदम मारहाण केली. पण तिथे जमलेल्या लोकांनी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतली. पण नितीनचं या हवालदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर या मारहाणीत जखमी झालेल्या नितीनवर सध्या भिवंडीच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघंही दारु प्याययल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close