S M L

शोध मराठी मनाचा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भटकर यांची निवड

20 नोव्हेंबरजागतिक मराठी अकादमीतर्फे घेण्यात येणार्‍या शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या अध्यक्षपदी संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर यांची निवड करण्यात आली. अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी औरंगाबादेत ही घोषणा केली. सात ते नऊ जानेवारी रोजी होणार्‍या या संमेलनाचे उदघाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात या संमेलनाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आयोजन समितीच्या बैठकीनंतर या संमेलनाची माहिती देण्यात आली. संमेलनात उद्योजक अविनाश राचमाले, वेणूगोपाल धूत, संजय गायकवाड, नरेंद्र हेटे, विठ्ठल कामत असे आघाडीचे मराठी उद्योजक व्यावसायिक त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. याशिवाय माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांनाही संमेलनात निमंत्रित करण्यात आले आहे. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई या कलावंतासंह नेमबाज तेजस्विनी सावंतही आपली यशोगाथा सांगणार आहेत. मधुकरराव मुळे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 04:00 PM IST

शोध मराठी मनाचा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भटकर यांची निवड

20 नोव्हेंबर

जागतिक मराठी अकादमीतर्फे घेण्यात येणार्‍या शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या अध्यक्षपदी संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर यांची निवड करण्यात आली. अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी औरंगाबादेत ही घोषणा केली. सात ते नऊ जानेवारी रोजी होणार्‍या या संमेलनाचे उदघाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात या संमेलनाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आयोजन समितीच्या बैठकीनंतर या संमेलनाची माहिती देण्यात आली. संमेलनात उद्योजक अविनाश राचमाले, वेणूगोपाल धूत, संजय गायकवाड, नरेंद्र हेटे, विठ्ठल कामत असे आघाडीचे मराठी उद्योजक व्यावसायिक त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. याशिवाय माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांनाही संमेलनात निमंत्रित करण्यात आले आहे. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई या कलावंतासंह नेमबाज तेजस्विनी सावंतही आपली यशोगाथा सांगणार आहेत. मधुकरराव मुळे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close