S M L

नागपूर टेस्टवर भारताची मजबूत पकड

21 नोव्हेंबरनागपूर टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतानं न्युझीलंडवर दमदार आघाडी घेतली आहे. मॅचच्या दुसर्‍या दिवस अखेर भारतानं 2 विकेट गमावत 292 रन्स केलेत आणि आता भारताकडे 99 रन्सची आघाडी आहे. भारताच्या पहिल्या चारही बॅट्समननं हाफसेंच्युरी केली. दुसर्‍या दिवस अखेर राहुल द्रविड 69 तर सचिन तेंडुलकर 57 रन्सवर नॉटआऊट आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरनं भारतीय इनिंगची सुरुवात केली. या जोडीनं आक्रमक बॅटिंग करत पहिल्या विकेटसाठी 113 रन्सची भक्कम पार्टनरशिप केली. सेहवाग 74 तर गंभीर 78 रन्सवर आऊट झाले. त्याआधी न्युझीलंडची पहिली इनिंग फक्त 193 रन्सवर ऑलआऊट झाली. पहिल्या दिवस अखेर 7 विकेट गमावत 148 रन्सवर खेळणार्‍या न्युझीलंडच्या बॅट्समनना आज फक्त 45 रन्स करता आले. मॅक्युलमनं 40 तर साऊदीनं 38 रन्स करत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या भेदक बॉलिंगसमोर त्यांचा टीकाव लागला नाही. ईशांत शर्मा सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर प्रग्यान ओझा 3 आणि श्रीसंतने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. आता मॅचच्या तिसर्‍या दिवशी क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असेल ती सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीची...

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2010 02:44 PM IST

नागपूर टेस्टवर भारताची मजबूत पकड

21 नोव्हेंबर

नागपूर टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतानं न्युझीलंडवर दमदार आघाडी घेतली आहे. मॅचच्या दुसर्‍या दिवस अखेर भारतानं 2 विकेट गमावत 292 रन्स केलेत आणि आता भारताकडे 99 रन्सची आघाडी आहे. भारताच्या पहिल्या चारही बॅट्समननं हाफसेंच्युरी केली. दुसर्‍या दिवस अखेर राहुल द्रविड 69 तर सचिन तेंडुलकर 57 रन्सवर नॉटआऊट आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरनं भारतीय इनिंगची सुरुवात केली. या जोडीनं आक्रमक बॅटिंग करत पहिल्या विकेटसाठी 113 रन्सची भक्कम पार्टनरशिप केली. सेहवाग 74 तर गंभीर 78 रन्सवर आऊट झाले.

त्याआधी न्युझीलंडची पहिली इनिंग फक्त 193 रन्सवर ऑलआऊट झाली. पहिल्या दिवस अखेर 7 विकेट गमावत 148 रन्सवर खेळणार्‍या न्युझीलंडच्या बॅट्समनना आज फक्त 45 रन्स करता आले. मॅक्युलमनं 40 तर साऊदीनं 38 रन्स करत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या भेदक बॉलिंगसमोर त्यांचा टीकाव लागला नाही. ईशांत शर्मा सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर प्रग्यान ओझा 3 आणि श्रीसंतने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. आता मॅचच्या तिसर्‍या दिवशी क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असेल ती सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीची...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2010 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close