S M L

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन संसदेत आजही गोंधळ

22 नोव्हेंबरटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीच्या मागणीवरून आजही (सोमवारी) विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. आज सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहाचे कामकाज सुुरु होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. मात्र 12 वाजता कामकाज पुन्हा सुरु होताच, विरोधक आणखी आक्रमक झाले. लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अखेर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 11:43 AM IST

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन संसदेत आजही गोंधळ

22 नोव्हेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीच्या मागणीवरून आजही (सोमवारी) विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. आज सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहाचे कामकाज सुुरु होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. मात्र 12 वाजता कामकाज पुन्हा सुरु होताच, विरोधक आणखी आक्रमक झाले. लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अखेर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close