S M L

हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेनेची बैठक

22 नोव्हेंबरयेत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवर आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली. आदर्श घोटाळा प्रकरणी सरकार बॅकफूटवर असताना हीच संधी साधून विरोधी पक्षाचे अस्तित्व जोरकसपणे दाखवण्याचा विचार शिवसेनेच्या विधीमंडळातल्या नेत्यांनी केला. गेल्या काही अधिवेशनात चांगले मुद्दे हाताशी असतानाही विरोधी पक्षाला सरकारला कात्रीत पकडता आलं नाही अशी टीका केली जात होती. तसेच विधानसभेचे उपाध्यक्षपद ही विरोधी पक्षाला द्यावे या भाजपच्या मागणीलाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 03:32 PM IST

हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेनेची बैठक

22 नोव्हेंबर

येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवर आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली. आदर्श घोटाळा प्रकरणी सरकार बॅकफूटवर असताना हीच संधी साधून विरोधी पक्षाचे अस्तित्व जोरकसपणे दाखवण्याचा विचार शिवसेनेच्या विधीमंडळातल्या नेत्यांनी केला. गेल्या काही अधिवेशनात चांगले मुद्दे हाताशी असतानाही विरोधी पक्षाला सरकारला कात्रीत पकडता आलं नाही अशी टीका केली जात होती. तसेच विधानसभेचे उपाध्यक्षपद ही विरोधी पक्षाला द्यावे या भाजपच्या मागणीलाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close