S M L

नो पार्किगच्या कंत्राटात कोट्यवधीचा गैरव्यवहार

22 नोव्हेंबरपुण्यामधली नो पार्किगमधली वाहनं उचलणार्‍यांच्या कंत्राटामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी केला. वाहन उचलणारा प्रत्येक टेम्पो दिवसाकाठी फक्त 10 ते 12 वाहनं उचलत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं.प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त वाहनं उचलली जात असुन हे सगळे पैसे कंत्राटदार आणि वाहतुक पोलिसांच्या खिशात जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.नो पार्किंगमध्ये लावलेली वाहनं उचलण्यासाठी पुणे पोलिसांनी कत्राटदाराची नेमणुक केली आहे. नो पार्किंगमधुन वाहन उचलल्यानंतर 150 रुपये दंड आकारला जातो. त्यातले 100 रुपये वाहतुक पोलिसांना तर टॅम्पोचालकांना एका गाडीमागे फक्त 50 रुपये मिळतात. दर दिवशी शेकडो वाहनं उचलली जात असताना दिवसाकाठी फक्त 10 ते बारा वाहनं उचलली जात असल्याची माहिती मिळाली आहे.पुण्यामध्ये वाहनतळं कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या पार्किंगचे मार्कही स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळं वाहनं उचलणारे लोक आणि नागरिक यांच्यात कायम वाद होत असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी वाहतुक पोलिस काय प्रयत्न करणार असाच प्रश्न उपस्थित होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 05:22 PM IST

नो पार्किगच्या कंत्राटात कोट्यवधीचा गैरव्यवहार

22 नोव्हेंबर

पुण्यामधली नो पार्किगमधली वाहनं उचलणार्‍यांच्या कंत्राटामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी केला. वाहन उचलणारा प्रत्येक टेम्पो दिवसाकाठी फक्त 10 ते 12 वाहनं उचलत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं.प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त वाहनं उचलली जात असुन हे सगळे पैसे कंत्राटदार आणि वाहतुक पोलिसांच्या खिशात जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

नो पार्किंगमध्ये लावलेली वाहनं उचलण्यासाठी पुणे पोलिसांनी कत्राटदाराची नेमणुक केली आहे. नो पार्किंगमधुन वाहन उचलल्यानंतर 150 रुपये दंड आकारला जातो. त्यातले 100 रुपये वाहतुक पोलिसांना तर टॅम्पोचालकांना एका गाडीमागे फक्त 50 रुपये मिळतात. दर दिवशी शेकडो वाहनं उचलली जात असताना दिवसाकाठी फक्त 10 ते बारा वाहनं उचलली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यामध्ये वाहनतळं कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या पार्किंगचे मार्कही स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळं वाहनं उचलणारे लोक आणि नागरिक यांच्यात कायम वाद होत असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी वाहतुक पोलिस काय प्रयत्न करणार असाच प्रश्न उपस्थित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close