S M L

आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेवची गोल्डन कामगिरी

22 नोव्हेंबरआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने टेनिसमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. पुरुषांच्या डबल्समध्ये सोमदेव आणि सनम सिंगने गोल्ड मेडल जिंकलं. सोमदेव आणि सनम सिंग यांनी फायनलमध्ये दुसर्‍या सिडेड चायनीज जोडीचा 6-3, 6-7 आणि 1-0 असा पराभव केला. आज सकाळीच सोमदेव आपली सिंगल्सची सेमी फायनल मॅच खेळला होता. त्यानंतर लगेचच डबल्स मॅच खेळायला तो उतरला. पण त्याने कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही.पहिला सेट भारतीय जोडीने 6-3 ने आरामात जिंकला. तर दुसरा सेट चीनच्या जोडीने टायब्रेकवर जिंकला. पण तिसरा सेट सुपर टायब्रेकरवर जिंकत भारतीय जोडीने गोल्ड पटकावलं.मिक्स्ड डबल्समध्ये सिल्व्हर मेडलमिक्स्ड डबल्समध्ये मात्र सानिया मिर्झा आणि विष्णू वर्धन जोडीला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. फायनलमध्ये चीन तैपेईच्या युंग जॅन चॅन आणि सुंग ह्यु यँग या जोडीने त्यांना 4-6, 6-1 आणि नंतर सुपर टायब्रेकरमध्ये हरवलं. खरंतर पहिल्या सेटमध्ये सानिया आणि विष्णू वर्धनला छान सूर गवसला होता. आणि ही मॅच जिंकण्याची संधी त्यांना आहे असं वाटत होतं. पण दुसर्‍या सेटपासून दोघांमधला समन्वय हरवला. आणि तिथून पुढे त्यांना फक्त एकच गेम जिंकता आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 05:27 PM IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेवची गोल्डन कामगिरी

22 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने टेनिसमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. पुरुषांच्या डबल्समध्ये सोमदेव आणि सनम सिंगने गोल्ड मेडल जिंकलं. सोमदेव आणि सनम सिंग यांनी फायनलमध्ये दुसर्‍या सिडेड चायनीज जोडीचा 6-3, 6-7 आणि 1-0 असा पराभव केला. आज सकाळीच सोमदेव आपली सिंगल्सची सेमी फायनल मॅच खेळला होता. त्यानंतर लगेचच डबल्स मॅच खेळायला तो उतरला. पण त्याने कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही.पहिला सेट भारतीय जोडीने 6-3 ने आरामात जिंकला. तर दुसरा सेट चीनच्या जोडीने टायब्रेकवर जिंकला. पण तिसरा सेट सुपर टायब्रेकरवर जिंकत भारतीय जोडीने गोल्ड पटकावलं.

मिक्स्ड डबल्समध्ये सिल्व्हर मेडल

मिक्स्ड डबल्समध्ये मात्र सानिया मिर्झा आणि विष्णू वर्धन जोडीला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. फायनलमध्ये चीन तैपेईच्या युंग जॅन चॅन आणि सुंग ह्यु यँग या जोडीने त्यांना 4-6, 6-1 आणि नंतर सुपर टायब्रेकरमध्ये हरवलं. खरंतर पहिल्या सेटमध्ये सानिया आणि विष्णू वर्धनला छान सूर गवसला होता. आणि ही मॅच जिंकण्याची संधी त्यांना आहे असं वाटत होतं. पण दुसर्‍या सेटपासून दोघांमधला समन्वय हरवला. आणि तिथून पुढे त्यांना फक्त एकच गेम जिंकता आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close