S M L

रवी कोका यांच्या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद

23 नोव्हेंबरजालन्यातल्या एका ध्येयवेड्या शिक्षकानं रेखाटलेल्या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रवी कोका यांनी 30 जानेवारी रोजी 86 हजार 71 चौरस मीटर रांगोळी साकारली होती. या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. त्याचबरोबर लिम्का बुकमध्येही या महाकाय रांगोळीची नोंद झाली आहे. रांगोळीची ही भारतीय कला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कोका यांनी हा प्रयत्न केला आहे. यासाठी 20 टन रांगोळी वापरण्यात आली तर रांगोळी काढण्यासाठी 51 सहाय्यकांनी त्यांना मदत केली होती. ही विशाल रांगोळी काढण्यासाठी तब्बल 34 तास 39 मिनिटं लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2010 01:00 PM IST

रवी कोका यांच्या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद

23 नोव्हेंबर

जालन्यातल्या एका ध्येयवेड्या शिक्षकानं रेखाटलेल्या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रवी कोका यांनी 30 जानेवारी रोजी 86 हजार 71 चौरस मीटर रांगोळी साकारली होती. या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. त्याचबरोबर लिम्का बुकमध्येही या महाकाय रांगोळीची नोंद झाली आहे. रांगोळीची ही भारतीय कला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कोका यांनी हा प्रयत्न केला आहे. यासाठी 20 टन रांगोळी वापरण्यात आली तर रांगोळी काढण्यासाठी 51 सहाय्यकांनी त्यांना मदत केली होती. ही विशाल रांगोळी काढण्यासाठी तब्बल 34 तास 39 मिनिटं लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close