S M L

विरोध छटपूजेला नाही, तर त्यामागच्या राजकीय नौटंकीला - राज ठाकरे

31 ऑक्टोबर, मुंबई ' कोणत्याही धार्मिक सणांना माझा विरोध नाही, पण त्याआडून जे शक्तिप्रदर्शन होतं, त्याला माझा विरोध आहे ' या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ' मी लहानपणापासून रामलीला बघत आलोय. दुर्गापूजेत सहभागी होत आलोय. रामलीलेतले सगळे कलाकार तर उत्तर भारतीयच होते, पण तेव्हा त्यात राजकीय स्टंटबाजी नव्हती. पण आता लालूप्रसाद यादव सारख्या नेत्यांनी छटपूजेचा राजकीय तमाशा बनवलाय. मी राजकारणावर टीका केली, पण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि छटपूजेला माझा विरोध आहे, असं भासवलं गेलं ' , असं ते म्हणाले.पोलिसांच्या परवानगीनं झालेल्या या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. पण आपली भूमिका कायद्याच्या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न करताना त्यांनी प्रक्षोभक विधाने करण्याचे टाळले. ' बाहेरच्या राज्यातल्या सामान्य माणसाला माझा विरोध नाही , पण माणसांचे जे लोंढे येतात आणि मतदारसंघ तयार करण्याच्यादृष्टीनं त्यांना जे राजकीय संरक्षण मिळते, त्याला माझा विरोध आहे ', असं ते म्हणाले.बिहारी नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातल्या नेत्यांवरही त्यांनी कडाडून टीका केली. ' मुख्यमंत्री म्हणाले होते की, एकही अनधिकृत झोपडी उभारून देणार नाही, पण पुढे त्यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. इतर राज्यातंही उत्तर भारतीयांविरुद्ध बोललं जातं, पण मग एकटा राज ठाकरे गुन्हेगार कसा ठरतो ? लालूंच्या कारकीर्दीत बिहारमध्ये 1200 खून झाले, तेंव्हा त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ' , अशी टीका त्यांनी केली.राहुल राज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ' पोलिसांनी जेव्हा त्याला ठार केलं, तेव्हा त्याचं राज्य केणतं, याची पोलिसांना काहीही कल्पना नव्हती. जर त्याच्या हातून कोणाचा खून झाला असता तर मीडियाने पोलिसांवरच टीका केली असती आणि दुदैर्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांची तोंडं न पाहणारे बिहारी राजकारणी यानिमित्तानं एकत्र आले, पण महाराष्ट्रातले राजकारणी मात्र एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानतात ' , असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 08:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close