S M L

जुहूतील मैदानाबाबत बैठक घेण्यास महापौरांची टाळाटाळ

24 नोव्हेंबरमुंबईत अत्यंत मोक्याची जागा असलेल्या जुहू परिसरात आंतराष्ट्रीय लायब्ररी आणि मनोरंजानासाठी मैदान या साठी दोन प्लॉटच आरक्षण आहे. या प्लॉटची खरेदी सुचना न काढल्यास मुंबई महानगरपालिकेचं कोट्यावधीच नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर हे आरक्षण रद्द झाल्यास मुंबईकर एका मैदानाला आणि आंतरराष्ट्रीय लायब्ररीला मुकतील. महापौर जाणिवपुर्वक खरेदी सुचने संदर्भातील बैठक घेण्यासं टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो.जुहू परिसरात मनोरंजनासाठीचं या मैदानाचं क्षेत्रफळ आहे 80 हजार 98 स्क्वेअर फुट तर आंतरराष्ट्रीय लायब्ररी ची मोकळी जागा याच प्लॉटच्या बाजुला आहे,त्याच क्षेत्रफळ आहे32 हजार 70 स्क्वेअर फुट हे दोनही प्लॉट संपादित करण्यासाठी खरेदीच्या सुचना संदर्भात विरोधी पक्षांनी चार वेळा पत्र दिलय परंतु महापौर मात्र खरेदी सुचनेची बैठक लावण्यात चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.मनोरंजनासाठीच्या मैदानाची किंमत बाजार भावाप्रमाणे 80 कोटींच्या घरात आहे. तर आंतरराष्ट्रीय लायब्ररीच्या प्लॉटची किंमत बाजार भावाप्रमाणे 32 कोटींच्या घरात आहे वेळीच या प्लॉटच्या खरेदीची सुचना न काढल्यास हे आरक्षण रद्द होईल आणि महानगरपालिकेच कोट्यावधींच नुकसान होईल. पण या संदर्भात महापौर अडवणुक करीत असल्याचं शिवसेनेच्या नगरसेवकांच बरोबरच मित्रपक्षाचही म्हणणं आहे. महापौर खरेदी सुचना टाळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सगळ्याचं गटनेत्यांच म्हणणं आहे. पण महापौरांनी मात्र यावर मौन बाळगण पसंत केलं. त्यामुळे आता 25 तारखेला होणा-या सभागृहात महापौर विरूध्द सर्व गटनेते असा आखाडा रंगलेला आपल्याला पहायला मिळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 01:44 PM IST

जुहूतील मैदानाबाबत बैठक घेण्यास महापौरांची टाळाटाळ

24 नोव्हेंबर

मुंबईत अत्यंत मोक्याची जागा असलेल्या जुहू परिसरात आंतराष्ट्रीय लायब्ररी आणि मनोरंजानासाठी मैदान या साठी दोन प्लॉटच आरक्षण आहे. या प्लॉटची खरेदी सुचना न काढल्यास मुंबई महानगरपालिकेचं कोट्यावधीच नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर हे आरक्षण रद्द झाल्यास मुंबईकर एका मैदानाला आणि आंतरराष्ट्रीय लायब्ररीला मुकतील. महापौर जाणिवपुर्वक खरेदी सुचने संदर्भातील बैठक घेण्यासं टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो.

जुहू परिसरात मनोरंजनासाठीचं या मैदानाचं क्षेत्रफळ आहे 80 हजार 98 स्क्वेअर फुट तर आंतरराष्ट्रीय लायब्ररी ची मोकळी जागा याच प्लॉटच्या बाजुला आहे,त्याच क्षेत्रफळ आहे32 हजार 70 स्क्वेअर फुट हे दोनही प्लॉट संपादित करण्यासाठी खरेदीच्या सुचना संदर्भात विरोधी पक्षांनी चार वेळा पत्र दिलय परंतु महापौर मात्र खरेदी सुचनेची बैठक लावण्यात चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

मनोरंजनासाठीच्या मैदानाची किंमत बाजार भावाप्रमाणे 80 कोटींच्या घरात आहे. तर आंतरराष्ट्रीय लायब्ररीच्या प्लॉटची किंमत बाजार भावाप्रमाणे 32 कोटींच्या घरात आहे वेळीच या प्लॉटच्या खरेदीची सुचना न काढल्यास हे आरक्षण रद्द होईल आणि महानगरपालिकेच कोट्यावधींच नुकसान होईल. पण या संदर्भात महापौर अडवणुक करीत असल्याचं शिवसेनेच्या नगरसेवकांच बरोबरच मित्रपक्षाचही म्हणणं आहे.

महापौर खरेदी सुचना टाळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सगळ्याचं गटनेत्यांच म्हणणं आहे. पण महापौरांनी मात्र यावर मौन बाळगण पसंत केलं. त्यामुळे आता 25 तारखेला होणा-या सभागृहात महापौर विरूध्द सर्व गटनेते असा आखाडा रंगलेला आपल्याला पहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close