S M L

इफ्फी फिल्म फेस्टिवलमध्ये 'विहीर' सिनेमाच आकर्षण

24 नोव्हेंबरगोव्यात सुरू असलेल्या 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्यामध्ये आजच्या दिवसाचं आकर्षण होतं विहीर हा सिनेमाच्या स्क्रिनींगचं. एबी कॉर्पची निर्मिती असलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. विहीर सिनेमाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि विहीरची टीम गोव्यात या फेस्टिव्हलसाठी उपस्थित आहे. उमेश कुलकर्णी आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी या दोघांचा विहीर आधी प्रदर्शित झालेला वळू हा सिनेमाही लोकप्रिय झाला होता. विहीर सिनेमाचं वैशिष्ठय म्हणजे अमिताभ बच्चन यांनी आपल्या एबी कॉर्प प्रॉडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली होती. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अमृता सुभाष, ज्योती सुभाष ,गिरीश कुलकर्णी यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेला हा सिनेमा अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्येही गाजला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 03:41 PM IST

इफ्फी फिल्म फेस्टिवलमध्ये 'विहीर' सिनेमाच आकर्षण

24 नोव्हेंबर

गोव्यात सुरू असलेल्या 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्यामध्ये आजच्या दिवसाचं आकर्षण होतं विहीर हा सिनेमाच्या स्क्रिनींगचं. एबी कॉर्पची निर्मिती असलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. विहीर सिनेमाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि विहीरची टीम गोव्यात या फेस्टिव्हलसाठी उपस्थित आहे. उमेश कुलकर्णी आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी या दोघांचा विहीर आधी प्रदर्शित झालेला वळू हा सिनेमाही लोकप्रिय झाला होता. विहीर सिनेमाचं वैशिष्ठय म्हणजे अमिताभ बच्चन यांनी आपल्या एबी कॉर्प प्रॉडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली होती. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अमृता सुभाष, ज्योती सुभाष ,गिरीश कुलकर्णी यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेला हा सिनेमा अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्येही गाजला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close