S M L

नितीशकुमार यांच्याबद्दल..

24 नोव्हेंबरबिहारच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवणारे नितीश कुमार आता खर्‍या अर्थानं बिहारी जनतेचे हिरो आणि 'बिहारी प्राईड' झालेत. नितीशकुमार इतर बिहारी राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली नव्हती. त्यांचं वेगळेपण जाणवतं ते सतत जातीयवादाच्या बदलत्या समीकरणांच्या बिहारमध्ये ते विकास आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतात तेव्हा..नितीशकुमार आणि लालूप्रसाद 1970 च्या जयप्रकाश नारायण यांच्या काँग्रेसविरोधी चळवळीचे प्रोडक्ट्स. निष्ठावान सोशलिस्ट आणि लोहियावादी आणि एकेकाळचे हे जवळचे मित्र आता एकमेकांचे हाडाचे शत्रू बनले. पण आपल्या आदर्शांपासून नितीशकुमार यांनी फारकत घेतली. आज त्यांनी लालूंना लोकप्रियतेत सगळ्याच दृष्टीनं मागं टाकलं आहे.नितीशकुमार 2005 मध्ये बिहारच्या सत्तेवर आले आणि त्यावेळेपासून बिहारनं नविन जगात प्रवेश केला असं म्हटलं जातं. बिहारचा विकासदर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला. बिहारमध्ये 2 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त रस्ते बांधले गेले. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे त्यांनी बिहारी जनतेला जातीच्या समीकरणातून बाहेर काढलं आणि बिहारी माणसाची नविन ओळख दिली.नितीशकुमारांना बिहारचा किमयागार म्हटलं जातं. त्यांनी बिहारमध्ये बदल घडवला तो पक्षाच्या पलीकडे जाऊन पण प्रशासनाची मदत घेऊन... प्रशासन सुरळीत चालल्याशिवाय विकास आणि न्याय शक्य नाही असं नितीशकुमारांचं म्हणणं आहे.नितीशकुमारांना प्रेमानं मुन्ना म्हटलं जातं. ते इंजिनियररिंगमध्ये ग्रॅज्युएट आहेत. 59 वर्षांचे नितीशकुमार पूर्णपणे व्यसनांपासून दूर आहेत. आणखीही त्यांच्याविषयी बरंच काही सांगता येईल. पण सध्या ते 'मॅन ऑफ द बिहार'आहेत आणि तेच सगळ्यांत जास्त महत्वाचं आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 05:56 PM IST

नितीशकुमार यांच्याबद्दल..

24 नोव्हेंबर

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवणारे नितीश कुमार आता खर्‍या अर्थानं बिहारी जनतेचे हिरो आणि 'बिहारी प्राईड' झालेत. नितीशकुमार इतर बिहारी राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली नव्हती. त्यांचं वेगळेपण जाणवतं ते सतत जातीयवादाच्या बदलत्या समीकरणांच्या बिहारमध्ये ते विकास आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतात तेव्हा..

नितीशकुमार आणि लालूप्रसाद 1970 च्या जयप्रकाश नारायण यांच्या काँग्रेसविरोधी चळवळीचे प्रोडक्ट्स. निष्ठावान सोशलिस्ट आणि लोहियावादी आणि एकेकाळचे हे जवळचे मित्र आता एकमेकांचे हाडाचे शत्रू बनले. पण आपल्या आदर्शांपासून नितीशकुमार यांनी फारकत घेतली. आज त्यांनी लालूंना लोकप्रियतेत सगळ्याच दृष्टीनं मागं टाकलं आहे.

नितीशकुमार 2005 मध्ये बिहारच्या सत्तेवर आले आणि त्यावेळेपासून बिहारनं नविन जगात प्रवेश केला असं म्हटलं जातं. बिहारचा विकासदर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला. बिहारमध्ये 2 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त रस्ते बांधले गेले. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे त्यांनी बिहारी जनतेला जातीच्या समीकरणातून बाहेर काढलं आणि बिहारी माणसाची नविन ओळख दिली.

नितीशकुमारांना बिहारचा किमयागार म्हटलं जातं. त्यांनी बिहारमध्ये बदल घडवला तो पक्षाच्या पलीकडे जाऊन पण प्रशासनाची मदत घेऊन... प्रशासन सुरळीत चालल्याशिवाय विकास आणि न्याय शक्य नाही असं नितीशकुमारांचं म्हणणं आहे.

नितीशकुमारांना प्रेमानं मुन्ना म्हटलं जातं. ते इंजिनियररिंगमध्ये ग्रॅज्युएट आहेत. 59 वर्षांचे नितीशकुमार पूर्णपणे व्यसनांपासून दूर आहेत. आणखीही त्यांच्याविषयी बरंच काही सांगता येईल. पण सध्या ते 'मॅन ऑफ द बिहार'आहेत आणि तेच सगळ्यांत जास्त महत्वाचं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close