S M L

कोची टीम रद्द होणार ?

25 नोव्हेंबरआयपीएलच्या कोची टीमचा फैसला येत्या रविवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम रद्द होणार हे आता निश्चित आहे. टीम मालकांमध्ये असलेला वाद अजून मिटलेला नाही. आणि टीम फ्रँचाईजींनी बीसीसीआयला पत्र लिहून टीम रद्द करण्याची विनंती केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मंगळवारी त्यांचं हे पत्र बीसीसीआयला पोहोचलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पत्र मिळाल्याची कबुलीही दिली. कोची टीम रद्द झाली तर नवीन टीमसाठीची निविदा प्रक्रिया 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 10:44 AM IST

कोची टीम रद्द होणार ?

25 नोव्हेंबर

आयपीएलच्या कोची टीमचा फैसला येत्या रविवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम रद्द होणार हे आता निश्चित आहे. टीम मालकांमध्ये असलेला वाद अजून मिटलेला नाही. आणि टीम फ्रँचाईजींनी बीसीसीआयला पत्र लिहून टीम रद्द करण्याची विनंती केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मंगळवारी त्यांचं हे पत्र बीसीसीआयला पोहोचलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पत्र मिळाल्याची कबुलीही दिली. कोची टीम रद्द झाली तर नवीन टीमसाठीची निविदा प्रक्रिया 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close