S M L

सोलापूरात होमगार्डसचं मानधन दीड वर्षापासून थकीत

25 नोव्हेंबरसोलापूरातल्या होमगार्डसचं मानधन गेल्या दीड वर्षापासून थकलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सूमारे दीडहजाराहून अधिक होंमगार्डसच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास 2000 पोलिसांची कमतरता असल्याने सोलापुरात होमगार्डसची नियुक्ती करण्यात आली. निवडणुका, उत्सव, यात्रा अशा ठिकाणी बंदोबस्त करताना अवघ्या 175 रुपये मानधनावर हे होमगार्डस सेवा बजावत आहे. काहींना तर नियुक्तीच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी देखील पैसे नाही. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन त्यांना ड्युटीवर जावं लागतं. या आर्थिक विवंचनेतून या होमगार्डसची सूटका केली नाही, तर खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून ते मृत्युला कवटाळण्याची भिती व्यक्त होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 11:47 AM IST

सोलापूरात होमगार्डसचं मानधन दीड वर्षापासून थकीत

25 नोव्हेंबर

सोलापूरातल्या होमगार्डसचं मानधन गेल्या दीड वर्षापासून थकलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सूमारे दीडहजाराहून अधिक होंमगार्डसच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास 2000 पोलिसांची कमतरता असल्याने सोलापुरात होमगार्डसची नियुक्ती करण्यात आली. निवडणुका, उत्सव, यात्रा अशा ठिकाणी बंदोबस्त करताना अवघ्या 175 रुपये मानधनावर हे होमगार्डस सेवा बजावत आहे. काहींना तर नियुक्तीच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी देखील पैसे नाही. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन त्यांना ड्युटीवर जावं लागतं. या आर्थिक विवंचनेतून या होमगार्डसची सूटका केली नाही, तर खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून ते मृत्युला कवटाळण्याची भिती व्यक्त होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close