S M L

नाशिक जिल्हयाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी

25 नोव्हेंबरअवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यात झालेलं भाताचे, निफाडमध्ये झालेलं द्राक्षाचे आणि चांदवड मध्ये झालेल्या कांद्याच्या नुकसानाचा अंदाज त्यांनी घेतला. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सव्वा लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान 1 हजार कोटींच्या घरात जातं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. अवकाळी पावसामुळे पिकं आणि फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. शासकीय निकषांच्या मर्यादा ओलांडून सगळ्या शेतकर्‍यांना मदत मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 01:35 PM IST

नाशिक जिल्हयाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी

25 नोव्हेंबर

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यात झालेलं भाताचे, निफाडमध्ये झालेलं द्राक्षाचे आणि चांदवड मध्ये झालेल्या कांद्याच्या नुकसानाचा अंदाज त्यांनी घेतला. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सव्वा लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान 1 हजार कोटींच्या घरात जातं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. अवकाळी पावसामुळे पिकं आणि फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. शासकीय निकषांच्या मर्यादा ओलांडून सगळ्या शेतकर्‍यांना मदत मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close