S M L

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा गोल्डन 'दस का दम'

25 नोव्हेंबरआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी आजचा दिवस गोल्डन ठरला आहे भारताच्या खात्यात 10 गोल्ड मेडल जमा झाली आहे. ऍथलेटिक्समध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले तर बॉक्सिंगमध्येही भारतानं गोल्ड मेडल पटकावलं आहे. तर दुसरीकडे भारतीय अस्सल मातीचा खेळ कबड्डीमध्ये पुरुष आणि महिला टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. विकास कृष्णननचा गोल्डन 'पंच' आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं बॉक्सिंगमध्ये पहिल्या गोल्ड मेडलची नोंद केली आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या विकास कृष्णननं गोल्डन कामगिरी करत. विकासनं चीनच्या क्वींग ह्युचा 5-4 असा पराभव केला. कृष्णननं मॅचमध्ये सुरूवातीला बचावावर अधिक भर दिला. चीनच्या बॉक्सरनेही आक्रमक खेळ करत कृष्णननला चांगली लढत दिली. पण मॅचच्या अखेरीस आक्रमक पवित्रा घेत विकासने गोल्डवर कब्जा केला.मात्र भारताच्या दिनेश कुमारला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. 81 किलो वजनी गटात ऊजबेकिस्तानच्या एल्सहुल रसुलोव्हनं त्याचा 10-4 असा पराभव केला. ऍथलेटिक्समध्ये भारताची 'गोल्डन' धाव ऍथलेटिक्समध्ये भारतानं तिसर्‍या गोल्ड मेडलची कमाई केली. 400 मीटर हर्डल्समध्ये भारताच्या आश्विनी अकुंजीने गोल्ड पटकावलं आहे. तिने वैयक्तिक सर्वोत्तम वेळही नोंदवली. आणि फायनल तिने 56 पूर्णांक 15 शतांश सेकंदात पूर्ण केली. क्वालिफायिंग राऊंडमध्ये अश्विनी आणि जाऊना मुरमू या दोन्ही भारतीय ऍथलीट्सची कामगिरी चांगली झाली होती. आणि त्यांनी आपली सर्वोत्तम वेळ दिली होती. त्यामुळे फायनलमध्ये दोघींकडून अपेक्षा होत्या. अश्विनीने क्वालिफायिंग राऊंडपेक्षा सरस कामगिरी करत अखेर बाजी मारली. जाऊनाचं मेडल अगदी थोडक्यात हुकलं. या प्रकारात चीनला सिल्व्हर तर जपानला ब्राँझ मेडल मिळालं.जोसेफ अब्राहिम अव्वलमहिलांपाठोपाठ पुरुषांच्या 400 मीटर हर्डलमध्येही भारताचा जोसेफ अब्राहिम अव्वल ठरला. जोसेफने 49 पूर्णांक 96 शतांश सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. या हंगामातली जोसेफची ही सर्वोत्तम वेळ आहे. जपानच्या केनजी नारिसाको आणि जोसेफ यांच्या निकराची लढत होती. पण 200 मीटर नंतर जोसेफने अचानक वेग वाढवला. आणि बाजी मारली. सौदी अरेबियाच्या याहा शाराहिलीने सिल्व्हर पटकावलं. भारताने पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये चार मिनिटांच्या अंतरात दोन गोल्ड पटकावली. 800 मीटर शर्यतीत लुकाला ब्राँझ मेडलभारताच्या टिंटू लुकाला मात्र ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं. 800 मीटर शर्यतीत लुकानं आघाडी घेत सुरुवात चांगली केली. पण निर्णायक क्षणी लुकाचा वेग काहीसा कमी झाला आणि याचा फायदा घेत कझाकस्तानच्या मार्गारेटा मटास्कोनं बाजी मारली. तीनं गोल्ड मेडलची कमाई केली. तर व्हिएतनामच्या थँन हँगनं सिल्व्हर मेडलची कमाई केली.कुस्तीमध्ये पहिलं ब्राँझ मेडलएशियन गेम्समध्ये कुस्तीमध्ये भारताने ब्राँझ मेडल पटकावलं आहे. मोसम खत्रीने 96 किलो वजनी गटात हे मेडल पटकावलं आहे. खत्रीने कोरियाच्या जेगांग किमचा 2-0ने आरामात पराभव केला. पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये खत्रीने आपला दबदबा ठेवला. आणि ब्राँझवर कब्जा केला. कुस्तीमधलं भारताचं हे तिसरं तर फ्रिस्टाईलमधलं भारताचं हे पहिलं ब्राँझ मेडल ठरलं आहे. कबड्डीत फायनलमध्ये धडक एशियन गेम्समध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताच्या पुरुष आणि महिला टीमनं मेडल पक्क केलं आहे. सेमी फायनलमध्ये भारताच्या महिला टीमनं इराणचा 23 विरुद्ध 22 पॉइंट्सनी पराभव केला. पण विजयासाठी इराणच्या टीमनं भारताला चांगलंच झुंजवलं. निर्धारित वेळेत लढत 17-17 अशी बरोबरीत होती. पहिल्या हाफमध्ये तर इराणनं 11 - 8 अशी आघाडी घेतली होती. भारताच्या चढाया फारशा धारदार नव्हत्या. आणि एकूण 8 वेळा चढाईत खेळाडू आऊट झाले. पण दुसर्‍या हाफमध्ये दीपिका कुमारीच्या जोरदार चढाया आणि पकडींमुळे भारताने अखेर ही मॅच जिंकली. आता फायनलमध्ये महिला टीमची गाठ थायलंडशी पडेल. यंदा पहिल्यांदाच महिला कबड्डीला एशियन गेम्समध्ये स्थान मिळालं आहे. दुसरीकडे पुरुषांच्या टीमची सेमी फायनलमध्ये लढत होती ती जपानशी. आणि या मॅचमध्ये भारतानं जपानचा 52 विरुद्ध 17 पॉइंट्सनी धुव्वा उडवला. पुरुषांच्या हॉकी टीमला ब्राँझभारताच्या पुरुषांच्या हॉकी टीमने अखेर ब्राँझ पटकावलं आहे. आज ब्राँझ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीमने कोरियाचा 1-0 ने पराभव केला. भारतासाठी एकमेव गोल तुषार खांडेकरने केला. पण भारतासाठी या विजयाचा हिरो ठरला तो गोलकीपर भरत छत्री. पहिल्याच हाफमध्ये त्याने 3 पेनल्टी कॉर्नर अप्रतिम वाचवले. शिवाय केरियाचं आक्रमण त्याने वेळोवेळी थोपवलं. भारतीय आक्रमणफळीची कामगिरी मात्र या मॅचमध्ये फारशी चांगली झाली नाही. त्यांच्या आक्रमणात सुसुत्रता दिसली नाही. त्यामुळे गोल करण्याच्या संधीही त्यांनी फुकट घालवल्या. इन फॉर्म संदीप सिंगनेही पेनल्टी कॉर्नरवर काही चुका केल्या. पहिल्या हाफमध्ये मॅच गोल शून्य बरोबरीत होती. पण दुसर्‍या हाफमध्ये चौथ्याच मिनिटाला तुषार खांडेकरने एक मैदानी गोल केला.आणि हा गोल मॅचमध्ये निर्णायक ठरला. भारतीय टीमने अखेर ब्राँझ मेडल पटकावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 02:25 PM IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा गोल्डन 'दस का दम'

25 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी आजचा दिवस गोल्डन ठरला आहे भारताच्या खात्यात 10 गोल्ड मेडल जमा झाली आहे. ऍथलेटिक्समध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले तर बॉक्सिंगमध्येही भारतानं गोल्ड मेडल पटकावलं आहे. तर दुसरीकडे भारतीय अस्सल मातीचा खेळ कबड्डीमध्ये पुरुष आणि महिला टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे.

विकास कृष्णननचा गोल्डन 'पंच'

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं बॉक्सिंगमध्ये पहिल्या गोल्ड मेडलची नोंद केली आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या विकास कृष्णननं गोल्डन कामगिरी करत. विकासनं चीनच्या क्वींग ह्युचा 5-4 असा पराभव केला. कृष्णननं मॅचमध्ये सुरूवातीला बचावावर अधिक भर दिला. चीनच्या बॉक्सरनेही आक्रमक खेळ करत कृष्णननला चांगली लढत दिली. पण मॅचच्या अखेरीस आक्रमक पवित्रा घेत विकासने गोल्डवर कब्जा केला.

मात्र भारताच्या दिनेश कुमारला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. 81 किलो वजनी गटात ऊजबेकिस्तानच्या एल्सहुल रसुलोव्हनं त्याचा 10-4 असा पराभव केला.

ऍथलेटिक्समध्ये भारताची 'गोल्डन' धाव

ऍथलेटिक्समध्ये भारतानं तिसर्‍या गोल्ड मेडलची कमाई केली. 400 मीटर हर्डल्समध्ये भारताच्या आश्विनी अकुंजीने गोल्ड पटकावलं आहे. तिने वैयक्तिक सर्वोत्तम वेळही नोंदवली. आणि फायनल तिने 56 पूर्णांक 15 शतांश सेकंदात पूर्ण केली. क्वालिफायिंग राऊंडमध्ये अश्विनी आणि जाऊना मुरमू या दोन्ही भारतीय ऍथलीट्सची कामगिरी चांगली झाली होती. आणि त्यांनी आपली सर्वोत्तम वेळ दिली होती. त्यामुळे फायनलमध्ये दोघींकडून अपेक्षा होत्या. अश्विनीने क्वालिफायिंग राऊंडपेक्षा सरस कामगिरी करत अखेर बाजी मारली. जाऊनाचं मेडल अगदी थोडक्यात हुकलं. या प्रकारात चीनला सिल्व्हर तर जपानला ब्राँझ मेडल मिळालं.

जोसेफ अब्राहिम अव्वल

महिलांपाठोपाठ पुरुषांच्या 400 मीटर हर्डलमध्येही भारताचा जोसेफ अब्राहिम अव्वल ठरला. जोसेफने 49 पूर्णांक 96 शतांश सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. या हंगामातली जोसेफची ही सर्वोत्तम वेळ आहे. जपानच्या केनजी नारिसाको आणि जोसेफ यांच्या निकराची लढत होती. पण 200 मीटर नंतर जोसेफने अचानक वेग वाढवला. आणि बाजी मारली. सौदी अरेबियाच्या याहा शाराहिलीने सिल्व्हर पटकावलं. भारताने पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये चार मिनिटांच्या अंतरात दोन गोल्ड पटकावली.

800 मीटर शर्यतीत लुकाला ब्राँझ मेडल

भारताच्या टिंटू लुकाला मात्र ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं. 800 मीटर शर्यतीत लुकानं आघाडी घेत सुरुवात चांगली केली. पण निर्णायक क्षणी लुकाचा वेग काहीसा कमी झाला आणि याचा फायदा घेत कझाकस्तानच्या मार्गारेटा मटास्कोनं बाजी मारली. तीनं गोल्ड मेडलची कमाई केली. तर व्हिएतनामच्या थँन हँगनं सिल्व्हर मेडलची कमाई केली.

कुस्तीमध्ये पहिलं ब्राँझ मेडल

एशियन गेम्समध्ये कुस्तीमध्ये भारताने ब्राँझ मेडल पटकावलं आहे. मोसम खत्रीने 96 किलो वजनी गटात हे मेडल पटकावलं आहे. खत्रीने कोरियाच्या जेगांग किमचा 2-0ने आरामात पराभव केला. पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये खत्रीने आपला दबदबा ठेवला. आणि ब्राँझवर कब्जा केला. कुस्तीमधलं भारताचं हे तिसरं तर फ्रिस्टाईलमधलं भारताचं हे पहिलं ब्राँझ मेडल ठरलं आहे.

कबड्डीत फायनलमध्ये धडक

एशियन गेम्समध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताच्या पुरुष आणि महिला टीमनं मेडल पक्क केलं आहे. सेमी फायनलमध्ये भारताच्या महिला टीमनं इराणचा 23 विरुद्ध 22 पॉइंट्सनी पराभव केला. पण विजयासाठी इराणच्या टीमनं भारताला चांगलंच झुंजवलं. निर्धारित वेळेत लढत 17-17 अशी बरोबरीत होती. पहिल्या हाफमध्ये तर इराणनं 11 - 8 अशी आघाडी घेतली होती. भारताच्या चढाया फारशा धारदार नव्हत्या. आणि एकूण 8 वेळा चढाईत खेळाडू आऊट झाले. पण दुसर्‍या हाफमध्ये दीपिका कुमारीच्या जोरदार चढाया आणि पकडींमुळे भारताने अखेर ही मॅच जिंकली. आता फायनलमध्ये महिला टीमची गाठ थायलंडशी पडेल. यंदा पहिल्यांदाच महिला कबड्डीला एशियन गेम्समध्ये स्थान मिळालं आहे. दुसरीकडे पुरुषांच्या टीमची सेमी फायनलमध्ये लढत होती ती जपानशी. आणि या मॅचमध्ये भारतानं जपानचा 52 विरुद्ध 17 पॉइंट्सनी धुव्वा उडवला.

पुरुषांच्या हॉकी टीमला ब्राँझ

भारताच्या पुरुषांच्या हॉकी टीमने अखेर ब्राँझ पटकावलं आहे. आज ब्राँझ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीमने कोरियाचा 1-0 ने पराभव केला. भारतासाठी एकमेव गोल तुषार खांडेकरने केला. पण भारतासाठी या विजयाचा हिरो ठरला तो गोलकीपर भरत छत्री. पहिल्याच हाफमध्ये त्याने 3 पेनल्टी कॉर्नर अप्रतिम वाचवले. शिवाय केरियाचं आक्रमण त्याने वेळोवेळी थोपवलं. भारतीय आक्रमणफळीची कामगिरी मात्र या मॅचमध्ये फारशी चांगली झाली नाही. त्यांच्या आक्रमणात सुसुत्रता दिसली नाही. त्यामुळे गोल करण्याच्या संधीही त्यांनी फुकट घालवल्या. इन फॉर्म संदीप सिंगनेही पेनल्टी कॉर्नरवर काही चुका केल्या. पहिल्या हाफमध्ये मॅच गोल शून्य बरोबरीत होती. पण दुसर्‍या हाफमध्ये चौथ्याच मिनिटाला तुषार खांडेकरने एक मैदानी गोल केला.आणि हा गोल मॅचमध्ये निर्णायक ठरला. भारतीय टीमने अखेर ब्राँझ मेडल पटकावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close