S M L

26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबरमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्याला समर्थपणे तोंड देताना जे पोलिस शहीद झाले. त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर पाटील यांनी श्रद्धांजली वाहली. यावेळी शहिदांचे कुटुंबियही उपस्थित होते. त्यांची चिदंबरम यांनी भेट घेतली.मुंबईकरांच्या असामान्य शौर्याला आणि एकजुटीला सलामपंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील 26/11 च्या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईकरांच्या असामान्य शौर्याला आणि एकजुटीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सलाम केलाय. या हल्ल्यामागे असणार्‍या दोषींना शिक्षा करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करु असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यामागच्या सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी कडक पावलं उचला असं भारतानं पाकिस्तानला बजावलंय. पाकमधल्या सर्व दहशतवादी यंत्रणा उद्‌ध्वस्त करा असा इशारा परराष्ट्रमंत्री एस एम कृ ष्णा यांनी पाकला दिला. पाकसोबत सर्व प्रश्न द्विपक्षी चर्चेद्वारे सोडवायला आम्ही कट्टीबध्द आहोत असही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 09:40 AM IST

26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबर

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्याला समर्थपणे तोंड देताना जे पोलिस शहीद झाले. त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर पाटील यांनी श्रद्धांजली वाहली. यावेळी शहिदांचे कुटुंबियही उपस्थित होते. त्यांची चिदंबरम यांनी भेट घेतली.

मुंबईकरांच्या असामान्य शौर्याला आणि एकजुटीला सलाम

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील 26/11 च्या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईकरांच्या असामान्य शौर्याला आणि एकजुटीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सलाम केलाय. या हल्ल्यामागे असणार्‍या दोषींना शिक्षा करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करु असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यामागच्या सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी कडक पावलं उचला असं भारतानं पाकिस्तानला बजावलंय. पाकमधल्या सर्व दहशतवादी यंत्रणा उद्‌ध्वस्त करा असा इशारा परराष्ट्रमंत्री एस एम कृ ष्णा यांनी पाकला दिला. पाकसोबत सर्व प्रश्न द्विपक्षी चर्चेद्वारे सोडवायला आम्ही कट्टीबध्द आहोत असही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close