S M L

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला अकरावं गोल्ड

26 नोव्हेंबरआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला अकरावं गोल्ड मिळालं आहे. कबड्डीत अपेक्षेप्रमाणेच महिला टीमने गोल्ड जिंकलंय. फायनलमध्ये भारतीय टीमने थायलंडचा 28-14 ने पराभव केला. भारतीय टीमने ही मॅच आरामात जिंकली. पहिल्या हाफमध्येच थायलंडवर जोन लोण चढवत भारताने सतरा - सात अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या हाफमध्येही भारतीय महिलांचंच वर्चस्व राहिलं. आणि त्यांनी ही मॅच मोठ्या फरकाने जिंकली. यावर्षी एशियन गेम्समध्ये महिला कबड्डीचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला होता. सीनिअर खेळाडू गोल्ड मेडलसाठी मैदानातआशियाई क्रीडा स्पर्धेला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. पण आज ऍथलेटिक्स आणि बॉक्सिंगमध्ये भारताचे काही सीनिअर खेळाडू गोल्ड मेडलसाठी मैदानात उतरतील. पुरुषांच्या ट्रिपल जंपमध्ये रणजीत महेश्वरीचं गोल्ड पक्कं समजलं जातं आहे. तर पुरुषांच्या शंभर मीटर रिले स्पर्धेतही भारताला गोल्डची आशा आहे. भारतीय टीम हंगामातली सर्वोत्तम वेळ नोंदवू शकली तर गोल्डची अपेक्षा धरता येईल महिलांच्या चारशे मीटर रिलेमध्ये मनप्रीत आणि मनजीत कौर या बहिणींच्या कामगिरीवरही सगळ्यांचं लक्ष असेल. बॉक्सिंगमध्ये विजेंदर, संतोष कुमार आणि मनप्रीत सिंग आज फायनल मॅच खेळतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 11:09 AM IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला अकरावं गोल्ड

26 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला अकरावं गोल्ड मिळालं आहे. कबड्डीत अपेक्षेप्रमाणेच महिला टीमने गोल्ड जिंकलंय. फायनलमध्ये भारतीय टीमने थायलंडचा 28-14 ने पराभव केला. भारतीय टीमने ही मॅच आरामात जिंकली. पहिल्या हाफमध्येच थायलंडवर जोन लोण चढवत भारताने सतरा - सात अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या हाफमध्येही भारतीय महिलांचंच वर्चस्व राहिलं. आणि त्यांनी ही मॅच मोठ्या फरकाने जिंकली. यावर्षी एशियन गेम्समध्ये महिला कबड्डीचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला होता.

सीनिअर खेळाडू गोल्ड मेडलसाठी मैदानात

आशियाई क्रीडा स्पर्धेला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. पण आज ऍथलेटिक्स आणि बॉक्सिंगमध्ये भारताचे काही सीनिअर खेळाडू गोल्ड मेडलसाठी मैदानात उतरतील. पुरुषांच्या ट्रिपल जंपमध्ये रणजीत महेश्वरीचं गोल्ड पक्कं समजलं जातं आहे. तर पुरुषांच्या शंभर मीटर रिले स्पर्धेतही भारताला गोल्डची आशा आहे. भारतीय टीम हंगामातली सर्वोत्तम वेळ नोंदवू शकली तर गोल्डची अपेक्षा धरता येईल महिलांच्या चारशे मीटर रिलेमध्ये मनप्रीत आणि मनजीत कौर या बहिणींच्या कामगिरीवरही सगळ्यांचं लक्ष असेल. बॉक्सिंगमध्ये विजेंदर, संतोष कुमार आणि मनप्रीत सिंग आज फायनल मॅच खेळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close