S M L

वरळी सी-लींकवरुन अज्ञात इसमाची आत्महत्या

27 नोव्हेंबर6 नोव्हेंबरला संपूर्ण शासकीय आणि पोलीस यंत्रणा बराक ओबामांच्या मुंबई दौर्‍यात गुंतली होती. आणि त्याचवेळी वरळी सी-लींकवरून एका माणसानं समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरातून ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. सी-लींकवरून समुद्रात उडी मारण्यापूर्वी हा माणूस या ब्रीजवर काहीतरी शोधत होता. त्याला एक पिशवीही मिळाली. ती पिशवी त्यानं समुद्रात फेकून दिली आणि नंतर त्यानं समुद्रात उडी मारली. 7 नोव्हेंबरला दादरच्या समुद्रकिनार्‍यावर एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. ही व्यक्ती कोण होती याचा पोलीस तपास करत आहे. पण सी-लींकवर कडक सुरक्षा असताना ही व्यक्ती इथं कशी पोहोचली ? असे प्रश्नही आता निर्माण होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2010 01:44 PM IST

वरळी सी-लींकवरुन अज्ञात इसमाची आत्महत्या

27 नोव्हेंबर

6 नोव्हेंबरला संपूर्ण शासकीय आणि पोलीस यंत्रणा बराक ओबामांच्या मुंबई दौर्‍यात गुंतली होती. आणि त्याचवेळी वरळी सी-लींकवरून एका माणसानं समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरातून ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली.

सी-लींकवरून समुद्रात उडी मारण्यापूर्वी हा माणूस या ब्रीजवर काहीतरी शोधत होता. त्याला एक पिशवीही मिळाली. ती पिशवी त्यानं समुद्रात फेकून दिली आणि नंतर त्यानं समुद्रात उडी मारली. 7 नोव्हेंबरला दादरच्या समुद्रकिनार्‍यावर एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. ही व्यक्ती कोण होती याचा पोलीस तपास करत आहे. पण सी-लींकवर कडक सुरक्षा असताना ही व्यक्ती इथं कशी पोहोचली ? असे प्रश्नही आता निर्माण होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close