S M L

कोल्हापूरनगरी बनली गड-किल्ल्यांची मांदियाळी

31 ऑक्टोबर, कोल्हापूर प्रताप नाईक दिवाळीत लहान मुलांकडून साकारले जाणारे किल्ले हे सा-यांचेच आकर्षण ठरतात. यंदा कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी उभे राहिलेले छोटे-मोठे किल्ले हे बुलंद शिवशाहीचं प्रतिक ठरले आहेतच. पण त्याचबरोबरीने या साकारलेल्या किल्ल्यांमागची लहानमुलांची कल्पना शक्ती पाहणा-याला नक्कीच थक्क करते. दिवाळीच्या कोल्हापूर शहरातून कुठेही फेरफटका मारला, तर ठिकठिकाणी उभारलेले लहान मोठे किल्ले लक्ष वेधून घेतात. दगड मातीच्या बरोबरीनं फरशी, विटांचे तुकडे, तुटक्या पाईप, खाप-या यांचा कल्पकतेनं वापर करून हे किल्ले साकारलेले आहेत. त्यापैकीच एक किल्ला म्हणजे बुधवार पेठेत साकरलेला विजयदुर्ग किल्ला. तो किल्ला सातवीत शिकणा-या प्रशांत सुके याने बनवला आहे. त्याने फक्त किल्ला तयार केला आहे असं नाही, तर किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळवली आहे. 'विजयदुर्ग किल्ला समुद्रात असून त्याला तटबंदी आहे. हे इंग्रजी आणि पोर्तुगीजांनाच काय पण आपल्यालाही माहीत नव्हतं. भारत स्वातंत्र झाला तेव्हा ए.व्ही.गुपचुप या शास्त्रज्ञाने पानबुडीतून ही तटबंदी शोधून काढली. तेव्हाकुठे कळलं की ही दगडाची तटबंदी आहे. ती तटबंदी अशाप्रकारे बांधली आहे की ओहटीच्या वेळीही दिसत नाही,' अशी माहिती प्रशांत सुके याने दिली. 'विजयदुर्ग किल्ल्या'बरोबरीने शहरातील विविध भागात 'रायगड', 'राजगड', 'विशाळगड' हे किल्लेही जसेच्या तसे कोल्हापूरमध्ये बाळगोपाळांनी उभारले आहेत. या किल्ल्यांची प्रमाणबध्दता पाहाणा-याला थक्क करून सोडते. भगतसिंग तरुण मंडळाच्या बालचमुंनी तयार केलेला पन्हाळा किल्ला तर बघणा-याच्या डोळ्याचं पारणं फेडतो. त्यामुळं हाही किल्ला पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीबरोबरच निरीक्षणालाही सलाम करावासा वाटतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close