S M L

नागपूरच्या यशवंत स्टेडियममधला तिबेटींचा स्वेटरबाजार

31 ऑक्टोबर, नागपूर कल्पना नळसकर दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. थंडीनं काही शहरं गारठून जातात. मग ठेवणीतल्या शाली, स्वेटर्स बाहेर पडतात. थंडीच्या शहारांतल्या स्वेटर बाजारांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. स्वेटर खरेदी करण्याची गर्दी होते. असंच दृश्य नागपूरच्या स्वेटर बाजारात दिसू लागलं आहे. थंडीची चाहूल लागताच क्षणी तिबेटी लोक नागपुरात आपली दुकानं थाटतात. यंदा महानगरपालिकेनं या विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार स्वेटर खरेदी मोठ्याप्रमाणावर होऊ लागली आहे. नागपूरचा स्वेटर बाजार विशेष प्रसिद्ध आहे. तिथे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचे स्वेटर मिळतातच पण त्याचबरोबरीने याठिकाणी दरवर्षी स्वेटरची नवनवीन व्हरायटी पहायला मिळते. इथे कोणत्याही स्वेटरची किंमत कोणत्याही दुकानात स्थिर असते. 80 रुपयांचं स्वेटर कधीच दुस-या दुकानांत 80 पेक्षा जास्त किंवा कमी किमतीला मिळत नाही. या स्वेटर बाजारात स्वेटर, जरकीन, मफरल, शॉल, कानटोपी, मुलांसाठी ऊनी वस्त्र आणि लेदर, रैगजिनचे कोटही मिळू लागले आहेत. एकच भाव असल्यामुळं ग्राहकांची फसवणूक होत नाही. स्वस्त किमतीत चांगले स्वेटर्स मिळतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close