S M L

आयपीएल कोची टीमचा निर्णय 5 डिसेंबरला

28 नोव्हेंबरकोची आयपीएल टीम आयपीएल सिझन चार मध्ये खेळणार कि नाही याचं भवितव्य आता 5 डिसेंबरला ठरणार आहे. नागपुरमध्ये आज बीसीसीआयच्या झालेल्या महत्वपुर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोची टीमबाबत निर्णय घेण्यासाठी आज नागपुरमध्ये आयपीएल गवर्निंग कौन्सिलची बैठक घेण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये कोची टीमच्या मालकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. कोची टीमला वाचवण्यासाठी टीम मालकांचे आता शेवटचे प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार शेअरहोल्डींग पॅटर्नमध्ये बदल करण्याची तयारी टीम मालकांनी दाखवली. त्याबाबतची कागदपत्रं बीसीसीआयला त्यांनी आज सादर केली. रोंदेवु कोची टीममधली आपली इक्वीटी 25 टक्क्यावरून 10 टक्क्यांवर आणणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे या बदललेल्या शेअर होल्डींग पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयने कोची टीमबाबतचा निर्णय पुढे ढकला आहे. आता 5 तारखेला मुंबईत होणार्‍या आयपीएलच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोची टीम वाचण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कोची टीम आयपीएल सिझन चार मध्ये खेळणार असल्याचं बोललं जातं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 12:26 PM IST

आयपीएल कोची टीमचा निर्णय 5 डिसेंबरला

28 नोव्हेंबर

कोची आयपीएल टीम आयपीएल सिझन चार मध्ये खेळणार कि नाही याचं भवितव्य आता 5 डिसेंबरला ठरणार आहे. नागपुरमध्ये आज बीसीसीआयच्या झालेल्या महत्वपुर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोची टीमबाबत निर्णय घेण्यासाठी आज नागपुरमध्ये आयपीएल गवर्निंग कौन्सिलची बैठक घेण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये कोची टीमच्या मालकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. कोची टीमला वाचवण्यासाठी टीम मालकांचे आता शेवटचे प्रयत्न सुरू झाले आहे.

त्यानुसार शेअरहोल्डींग पॅटर्नमध्ये बदल करण्याची तयारी टीम मालकांनी दाखवली. त्याबाबतची कागदपत्रं बीसीसीआयला त्यांनी आज सादर केली. रोंदेवु कोची टीममधली आपली इक्वीटी 25 टक्क्यावरून 10 टक्क्यांवर आणणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे या बदललेल्या शेअर होल्डींग पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयने कोची टीमबाबतचा निर्णय पुढे ढकला आहे. आता 5 तारखेला मुंबईत होणार्‍या आयपीएलच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोची टीम वाचण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कोची टीम आयपीएल सिझन चार मध्ये खेळणार असल्याचं बोललं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close