S M L

आदर्श सोसायटी गहाळ फाईल प्रकरण गुन्हे शाखाकडे

28 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे. वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या मूळ फायलीतून पान नंबर 15, 97, 99, 279 ही चार पानं गायब झाली आहेत.या चारही पानांवर महत्त्वाचे नोंदी करण्यात आल्या होत्या. 30 ऑगस्ट 2009 ते 1 नोव्हेबर 2010 दरम्यान ही कागदपत्र गहाळ झाल्याची एफआयआर मध्ये नोंद आहे. 2003 मध्ये नगर विकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी या नोंदी केल्या होत्या. या नोंदीच्या आधारे काही अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित केली जाऊ शकणार होती. आता या नोंदींची पानं गायब झाल्यानं पुन्हा एकदा सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचं साटलोटं असल्याचं दिसत आहे. सर्व संबंधित विभागांकडे शोधूनही पानं सापडत नसल्यामुळं अखेर नगरविकास विभागानं मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. पण आता याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी 204 आणि 380 कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 12:40 PM IST

आदर्श सोसायटी गहाळ फाईल प्रकरण गुन्हे शाखाकडे

28 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे. वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या मूळ फायलीतून पान नंबर 15, 97, 99, 279 ही चार पानं गायब झाली आहेत.या चारही पानांवर महत्त्वाचे नोंदी करण्यात आल्या होत्या. 30 ऑगस्ट 2009 ते 1 नोव्हेबर 2010 दरम्यान ही कागदपत्र गहाळ झाल्याची एफआयआर मध्ये नोंद आहे. 2003 मध्ये नगर विकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी या नोंदी केल्या होत्या. या नोंदीच्या आधारे काही अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित केली जाऊ शकणार होती. आता या नोंदींची पानं गायब झाल्यानं पुन्हा एकदा सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचं साटलोटं असल्याचं दिसत आहे. सर्व संबंधित विभागांकडे शोधूनही पानं सापडत नसल्यामुळं अखेर नगरविकास विभागानं मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. पण आता याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी 204 आणि 380 कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close