S M L

वाशीममध्ये शाळेत गॅस सिलेंडरचा स्फोट

28 नोव्हेंबरवाशीम इथल्या प्राथमिक शाळेत सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झालेत. ही शाळा वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. या आगीमुळे शाळेतील संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाला. या शाळेत 1 ली ते 7 वीचे वर्ग असून त्यात 350 विद्यार्थी शिकतात. आगीमुळे शाळेचं 4 ते 5 लाखाचं नुकसान झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थपनानं व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 03:48 PM IST

वाशीममध्ये शाळेत गॅस सिलेंडरचा स्फोट

28 नोव्हेंबर

वाशीम इथल्या प्राथमिक शाळेत सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झालेत. ही शाळा वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. या आगीमुळे शाळेतील संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाला. या शाळेत 1 ली ते 7 वीचे वर्ग असून त्यात 350 विद्यार्थी शिकतात. आगीमुळे शाळेचं 4 ते 5 लाखाचं नुकसान झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थपनानं व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close