S M L

91 व्या अखिल भारतीय संमेलनच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची निवड

28 नोव्हेंबरजानेवारीत रत्नागिरीत होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनच्या अध्यक्षपदी अकोल्याचे नाटककार राम जाधव यांची निवड आज नाट्यपरिषदेच्या बैठकीत करण्यात आली. मी संक्षिप्त नटसम्राट' या नाटकामुळs राम जाधव यांना खरी ओळख मिळाली. ते अखिल भारतीय नाट्य परिक्षण मंडळाचे सदस्य होते. विदर्भात नाटय चळवळ रूजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. दरम्यान, अमेरिकेत झालेलं नव्वदावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन वादामुळे गाजलं होतं. अखेर आज नाट्यपरिषदेच्या सर्व सदस्यांसमोर नाट्यपरिषेदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी या संमेलनाचा हिशेब मांडला. तब्बल 1 कोटी 74 लाख 34 हजार 921 रुपयांचा हिशेब मांडत मोहन जोशींनी संपूर्ण कार्यकारणीची वाहवा मिळवली. आजवर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अचानक सर्व सदस्यांनी केलेल्या कौतुकामुळे यावेळी मोहन जोशी भारावून गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 04:07 PM IST

91 व्या अखिल भारतीय संमेलनच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची निवड

28 नोव्हेंबर

जानेवारीत रत्नागिरीत होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनच्या अध्यक्षपदी अकोल्याचे नाटककार राम जाधव यांची निवड आज नाट्यपरिषदेच्या बैठकीत करण्यात आली. मी संक्षिप्त नटसम्राट' या नाटकामुळs राम जाधव यांना खरी ओळख मिळाली. ते अखिल भारतीय नाट्य परिक्षण मंडळाचे सदस्य होते. विदर्भात नाटय चळवळ रूजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. दरम्यान, अमेरिकेत झालेलं नव्वदावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन वादामुळे गाजलं होतं. अखेर आज नाट्यपरिषदेच्या सर्व सदस्यांसमोर नाट्यपरिषेदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी या संमेलनाचा हिशेब मांडला. तब्बल 1 कोटी 74 लाख 34 हजार 921 रुपयांचा हिशेब मांडत मोहन जोशींनी संपूर्ण कार्यकारणीची वाहवा मिळवली. आजवर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अचानक सर्व सदस्यांनी केलेल्या कौतुकामुळे यावेळी मोहन जोशी भारावून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close