S M L

बेस्टमध्ये भ्रष्टाचाराचं 'व्यवस्थापन'

29 नोव्हेंबरबेस्टचे उप महा व्यवस्थापक एस.ए. पुराणिक यांनी 5 कोटी 66 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालं आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची विभागीय चौकशी माजी न्यायाधिश आर जे कोचर यांनी केली. त्यामध्ये एस. ए. पुराणिक यांनी गैरव्यवहार केल्याचं स्पष्टपणे उघड झालं आहे. तसा अहवाल कोचर यांनी बेस्टला 15 नोव्हेबर 2010 ला सादर केला. यासंदर्भात पुराणिक यांच्याविरोधात इकॉनॉमिक डिफेन्स वींगमध्ये गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचं 'व्यवस्थापन' -इंडीयन कॅब कंपनीकडून 5.4 कोटी रुपयांचे अनावश्यक आणि कुचकामी विजेचे मिटर्स खरेदी केले-काही विजेची बिलं लाच घेऊन कमी केली -सागर स्वीट्स आणि बेकरी यांचं 19.82 लाखाचं बील 2.63 लाख केलं-टी आर आणि कमला सेवाकरमानीचं 4.70 लाखाचं बील 1.31 लाख केलं-न्यु इंडिया केबल कॉर्पोरेशनचं 17.75 लाखाचं बील 5.6 लाख केलं-मलराज उर्स कंपनीचं 19.54 लाखाचं बील 6.3 लाख केलं-हँपर फार्मासीटीकलचं 13.50 लाखांचं बील 16 हजार केलं-ही बिलं कमी केल्यानं बेस्टचं एकूण 60 लाखांचं नुकसान झालंत्याचबरोबर पृथ्वी या कंपनीच्या जाहिरातदाराला जवळजवळ फुकट जाहिरात देऊन बेस्टचं 2 लाखाचं नुकसान झालं. 15 नोव्हेबर 2010ला हा चौकशी अहवाल बेस्ट प्रशासनाला सादर केल्यानंतरही बेस्टनं कोणतीही बैठक बोलावलेली नाही किंवा पुराणिक यांचं निलंबन अथवा बडतर्फीही केलेली नाही. एकप्रकारे सत्ताधारी शिवसेना भाजप हे पुराणिक यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं असा आरोप विरोधी पक्षांनी केला. 1 डिसेंबर 2010 रोजी पुराणिक हे निवृत्त होत आहेत अशावेळी त्यांच्या निवृत्तीपूर्वी बेस्टचे अध्यक्ष संजय पोतनीस यांनी बैठक बोलावून पुराणिक यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात मात्र पुराणिक यांना पाठीशी घालण्याचं काम सत्ताधार्‍यांनी केलं

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 09:56 AM IST

बेस्टमध्ये भ्रष्टाचाराचं 'व्यवस्थापन'

29 नोव्हेंबर

बेस्टचे उप महा व्यवस्थापक एस.ए. पुराणिक यांनी 5 कोटी 66 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालं आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची विभागीय चौकशी माजी न्यायाधिश आर जे कोचर यांनी केली. त्यामध्ये एस. ए. पुराणिक यांनी गैरव्यवहार केल्याचं स्पष्टपणे उघड झालं आहे. तसा अहवाल कोचर यांनी बेस्टला 15 नोव्हेबर 2010 ला सादर केला. यासंदर्भात पुराणिक यांच्याविरोधात इकॉनॉमिक डिफेन्स वींगमध्ये गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराचं 'व्यवस्थापन'

-इंडीयन कॅब कंपनीकडून 5.4 कोटी रुपयांचे अनावश्यक आणि कुचकामी विजेचे मिटर्स खरेदी केले

-काही विजेची बिलं लाच घेऊन कमी केली

-सागर स्वीट्स आणि बेकरी यांचं 19.82 लाखाचं बील 2.63 लाख केलं

-टी आर आणि कमला सेवाकरमानीचं 4.70 लाखाचं बील 1.31 लाख केलं

-न्यु इंडिया केबल कॉर्पोरेशनचं 17.75 लाखाचं बील 5.6 लाख केलं

-मलराज उर्स कंपनीचं 19.54 लाखाचं बील 6.3 लाख केलं

-हँपर फार्मासीटीकलचं 13.50 लाखांचं बील 16 हजार केलं

-ही बिलं कमी केल्यानं बेस्टचं एकूण 60 लाखांचं नुकसान झालं

त्याचबरोबर पृथ्वी या कंपनीच्या जाहिरातदाराला जवळजवळ फुकट जाहिरात देऊन बेस्टचं 2 लाखाचं नुकसान झालं. 15 नोव्हेबर 2010ला हा चौकशी अहवाल बेस्ट प्रशासनाला सादर केल्यानंतरही बेस्टनं कोणतीही बैठक बोलावलेली नाही किंवा पुराणिक यांचं निलंबन अथवा बडतर्फीही केलेली नाही. एकप्रकारे सत्ताधारी शिवसेना भाजप हे पुराणिक यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं असा आरोप विरोधी पक्षांनी केला. 1 डिसेंबर 2010 रोजी पुराणिक हे निवृत्त होत आहेत अशावेळी त्यांच्या निवृत्तीपूर्वी बेस्टचे अध्यक्ष संजय पोतनीस यांनी बैठक बोलावून पुराणिक यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात मात्र पुराणिक यांना पाठीशी घालण्याचं काम सत्ताधार्‍यांनी केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close