S M L

माझं शरीर थकलंय, माझ्या तब्येतीला जपा - शिवसेनाप्रमुख

31 ऑक्टोबर, मुंबई' लोंढेच्या लोंढे भेटायला येतात. पण आता अशा भेटीगाठींनी मी पूर्णपणे थकून जातो. कृपया मला समजून घ्या. माझ्या तब्येतीला तुम्हीच जपा, असं भावनिक आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ' सामना ' मध्ये त्यांनी यासंदर्भातलं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. शिवसेनाप्रमुख म्हणतात, पाडव्याच्या दिवशी मला भेटायला येण्यासाठी अनेक महिलांसह शिवसैनिकांचे लोंढेच्या लोंढे मातोश्रीवर आदळत होते. उद्धवला भेटून पुन्हा हे शिवसैनिक माझ्याकडेही यायचे. एकदा शिवसेनेची सूत्रं उद्धवकडे सोपवल्यानंतर पुन्हा मला भेटण्यासाठी येण्याचं काय प्रयोजन, असा सवाल त्यांनी केला आहे. माझं वाढतं वय आणि थकत चाललेले शरीर मला पेलवत नाही. कृपया मला समजून घ्या, असं बाळासाहेबांनी म्हटलंय.उद्धवला आवश्यकता वाटेल त्यावेळी तो माझा सल्ला घेतच असतो.आपण असे लोंढ्यामागून लोढ्यांनी भेटल्यानंतर मी पूर्ण थकून जातो. म्हणून कृपया येणार्‍या वाढदिवशी माझ्या तब्येतीला जपा,अशी विनंती बाळासाहेबांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close