S M L

पर्यावरण मंत्रालयाच्या नोटीसला लवासाचं उत्तर

29 नोव्हेंबरपर्यावरण विभागानं दिलेल्या नोटीसला लवासानं उत्तर दिलं आहे. ही नोटीस नैसर्गिक न्यायाच्या विरूध्द असून पर्यावरण खात्यानं कुठलीही पाहणी न करता ही नोटीस बजावली असं लवासानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अखत्यारित ही बाब येत नाही. मेधा पाटकर यांच्या दबावाखाली ही नोटीस काढण्यात आली. गेली 6 वर्ष लवासाचं बांधकाम सुरू असून 3 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर हजारो लोकांना तिथं रोजगार मिळाला आहे. या बाबीही लक्षात घ्याव्यात असंही लवासानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 10:39 AM IST

पर्यावरण मंत्रालयाच्या नोटीसला लवासाचं उत्तर

29 नोव्हेंबर

पर्यावरण विभागानं दिलेल्या नोटीसला लवासानं उत्तर दिलं आहे. ही नोटीस नैसर्गिक न्यायाच्या विरूध्द असून पर्यावरण खात्यानं कुठलीही पाहणी न करता ही नोटीस बजावली असं लवासानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अखत्यारित ही बाब येत नाही. मेधा पाटकर यांच्या दबावाखाली ही नोटीस काढण्यात आली. गेली 6 वर्ष लवासाचं बांधकाम सुरू असून 3 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर हजारो लोकांना तिथं रोजगार मिळाला आहे. या बाबीही लक्षात घ्याव्यात असंही लवासानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close