S M L

मोहन जोशींनी 'हिशेब' दिला

29 नोव्हेंबरजानेवारी महिन्यात होणार्‍या नाट्यसंमेलनाची माहिती देण्यासाठी अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार परिषद गाजली ती मोहन जोशींच्या तुफान फटकेबाजीमुळे. मोहन जोशींच्या नाट्यपरिषदेच्या कारभारावर आणि त्यांच्या वैयक्तिक वागण्यावर नेहमी टीका करणारे सुयोगचे निर्माते सुधीर भट यांना मोहन जोशींनी या पत्रकार परिषदेत आपल्या स्टाईलने उत्तरं दिली.सुधीर भटांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते माझ्यासकट सर्व कलावंताना त्रास देत आहेत. त्यांची मस्तवालगिरी वाढली असून अख्खी रंगभूमी विकत घेतल्याच्या थाटात ते वागतात. आणि रंगभूमीची वाट जरी कुणी लावली असेल तर ती सुधीर भटांनी लावली असे सणसणीत टोले यावेळी मोहन जोशींनी हाणले. यावेळी मोहन जोशींनी न्यू-जर्सीत झालेल्या पहिल्या वैश्विक नाट्यसंमेलनाचे हिशेबही पत्रकारांसमोर सादर केले. त्याचबरोबर आपल्यावर आरोप करणार्‍या सुधीर भटांनांही सणसणीत उत्तरं देऊन तो ही हिशेब चुकता केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 11:27 AM IST

मोहन जोशींनी 'हिशेब' दिला

29 नोव्हेंबर

जानेवारी महिन्यात होणार्‍या नाट्यसंमेलनाची माहिती देण्यासाठी अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार परिषद गाजली ती मोहन जोशींच्या तुफान फटकेबाजीमुळे. मोहन जोशींच्या नाट्यपरिषदेच्या कारभारावर आणि त्यांच्या वैयक्तिक वागण्यावर नेहमी टीका करणारे सुयोगचे निर्माते सुधीर भट यांना मोहन जोशींनी या पत्रकार परिषदेत आपल्या स्टाईलने उत्तरं दिली.

सुधीर भटांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते माझ्यासकट सर्व कलावंताना त्रास देत आहेत. त्यांची मस्तवालगिरी वाढली असून अख्खी रंगभूमी विकत घेतल्याच्या थाटात ते वागतात. आणि रंगभूमीची वाट जरी कुणी लावली असेल तर ती सुधीर भटांनी लावली असे सणसणीत टोले यावेळी मोहन जोशींनी हाणले. यावेळी मोहन जोशींनी न्यू-जर्सीत झालेल्या पहिल्या वैश्विक नाट्यसंमेलनाचे हिशेबही पत्रकारांसमोर सादर केले. त्याचबरोबर आपल्यावर आरोप करणार्‍या सुधीर भटांनांही सणसणीत उत्तरं देऊन तो ही हिशेब चुकता केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close