S M L

कोल्हापूरात द सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचं आयोजन

29 नोव्हेंबरमोटारसायकलीच्या चित्तथरारक कसरती, श्वास रोखायला लावणारा वेग आणि अडथळ्यांच्या शर्यतीचा थरार कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. कोल्हापूरातल्या मोहीते रेसिंग ट्रॅकवर एम.आर.एफ टायरच्यावतीनं 'द सुपरक्रॉस चॅम्पियनशीप' स्पर्धेच्या पाचव्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नामवंत स्पर्धकांसह 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता. फॉरीन ओपन, नो-व्हाईस इंडियन एक्सपर्ट अशा प्रकारात ह्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोईम्बतुरच्या संतोष सी.एस. नं बेस्ट रायडर ऑफ दि रेस,आणि कोल्हापूरच्या सचिनघोरपडेनं लोकल बेस्ट रायडरचा किताब पटकावला. यापूर्वी पहिली फेरी 30 मे रोजी बेंगलोर इथं झाली होती. दुसरी फेरी 10 जुलैला कोईमतुर इथं झाली. तिसरी फेरी 25 जुलैला जयपुर इथं तर चौथी फेरी 31 ऍक्टोबरला बडोदा इथं पार पडली. 12 डिसेंबरला सहावी आणि अंतीम फेरी पुण्यात पार पडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 11:44 AM IST

कोल्हापूरात द सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचं आयोजन

29 नोव्हेंबर

मोटारसायकलीच्या चित्तथरारक कसरती, श्वास रोखायला लावणारा वेग आणि अडथळ्यांच्या शर्यतीचा थरार कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. कोल्हापूरातल्या मोहीते रेसिंग ट्रॅकवर एम.आर.एफ टायरच्यावतीनं 'द सुपरक्रॉस चॅम्पियनशीप' स्पर्धेच्या पाचव्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नामवंत स्पर्धकांसह 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता. फॉरीन ओपन, नो-व्हाईस इंडियन एक्सपर्ट अशा प्रकारात ह्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोईम्बतुरच्या संतोष सी.एस. नं बेस्ट रायडर ऑफ दि रेस,आणि कोल्हापूरच्या सचिनघोरपडेनं लोकल बेस्ट रायडरचा किताब पटकावला.

यापूर्वी पहिली फेरी 30 मे रोजी बेंगलोर इथं झाली होती. दुसरी फेरी 10 जुलैला कोईमतुर इथं झाली. तिसरी फेरी 25 जुलैला जयपुर इथं तर चौथी फेरी 31 ऍक्टोबरला बडोदा इथं पार पडली. 12 डिसेंबरला सहावी आणि अंतीम फेरी पुण्यात पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close