S M L

चौकशीला मी सामोर जायला तयार आहे - कलमाडी

29 नोव्हेंबरकॉमनवेल्थ गेम्समधल्या घोट्याळ्यात अडकलेले काँग्रेसचे खासदार आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आता लवकरच सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. AM फिल्म स्कॅम आणि आयोजनादरम्यान झालेल्या करोडो रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच कलमाडींचे डावे-उजवे समजले जाणारे टी.एस. दरबारी आणि संजय महेंद्रु यांच्याही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. पण यावर मात्र कलमाडी यांनी आपली बाजू मांडली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी संसदेत देणार आहे असं कलमाडी म्हणाले. मी यात काहीही चुकीचं केलेलं नाही आणि कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे, असंही कलमाडी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 12:49 PM IST

चौकशीला मी सामोर जायला तयार आहे - कलमाडी

29 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ गेम्समधल्या घोट्याळ्यात अडकलेले काँग्रेसचे खासदार आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आता लवकरच सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. AM फिल्म स्कॅम आणि आयोजनादरम्यान झालेल्या करोडो रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच कलमाडींचे डावे-उजवे समजले जाणारे टी.एस. दरबारी आणि संजय महेंद्रु यांच्याही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. पण यावर मात्र कलमाडी यांनी आपली बाजू मांडली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी संसदेत देणार आहे असं कलमाडी म्हणाले. मी यात काहीही चुकीचं केलेलं नाही आणि कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे, असंही कलमाडी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close