S M L

राम प्रधान अहवालाबाबत बैठक घेण्यात येईल -मुख्यमंत्री

30 नोव्हेंबरहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर राम प्रधान अहवालाबाबत बैठक घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यानी आयबीएन लोकमतशी बातचित करताना सांगितले.मुंबई हल्ल्याप्रकरणी राम प्रधान समितीनं एक गोपनीय अहवाल दिला होता. त्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचं उघडकीस आलं आहे. आयबीएन लोकमतच्या या गोप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांना सिक्रेट डॉक्युमेंट्स दिल्याच्या बातमीला समितीचे सदस्य व्ही. बालचंद्रन यांनीही दुजोरा दिला आहे. तसंच राम प्रधान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर आज (मंगळवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 01:52 PM IST

राम प्रधान अहवालाबाबत बैठक घेण्यात येईल -मुख्यमंत्री

30 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर राम प्रधान अहवालाबाबत बैठक घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यानी आयबीएन लोकमतशी बातचित करताना सांगितले.

मुंबई हल्ल्याप्रकरणी राम प्रधान समितीनं एक गोपनीय अहवाल दिला होता. त्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचं उघडकीस आलं आहे. आयबीएन लोकमतच्या या गोप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांना सिक्रेट डॉक्युमेंट्स दिल्याच्या बातमीला समितीचे सदस्य व्ही. बालचंद्रन यांनीही दुजोरा दिला आहे. तसंच राम प्रधान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर आज (मंगळवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close