S M L

जळगाव विधानपरिषद निवडणूकीत मनिष जैन विजयी

30 नोव्हेंबरजळगाव विधानपरिषद निवडणूकीत झालेल्या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार मनिष जैन विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार निखिल खडसे यांचा पराभव केला. मतमोजणी दरम्यान खडसे यांनी उपस्थित केलेल्या सर्व हरकती निवडणूक आयोगानं फेटाळून लावल्या. मनिष जैन हे केवळ 16 मतांनी विजयी झाले. हा अधिकार निवडणूक निर्णय अधिकार्‍याचा आहे असं आयोगानं म्हटलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जळगाव विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मनिष जैन यांचा विजय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इथून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे निवडणुकीच्या रिंगणात होता. तर मनिष जैन राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचा मुलगा आहे. त्याना शिवसेनेनं छुपा पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेशदादा जैन यांनी उघडपणे मनिष जैन यांना पाठिंबा दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 02:04 PM IST

जळगाव विधानपरिषद निवडणूकीत मनिष जैन विजयी

30 नोव्हेंबर

जळगाव विधानपरिषद निवडणूकीत झालेल्या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार मनिष जैन विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार निखिल खडसे यांचा पराभव केला. मतमोजणी दरम्यान खडसे यांनी उपस्थित केलेल्या सर्व हरकती निवडणूक आयोगानं फेटाळून लावल्या. मनिष जैन हे केवळ 16 मतांनी विजयी झाले. हा अधिकार निवडणूक निर्णय अधिकार्‍याचा आहे असं आयोगानं म्हटलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जळगाव विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मनिष जैन यांचा विजय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इथून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे निवडणुकीच्या रिंगणात होता. तर मनिष जैन राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचा मुलगा आहे. त्याना शिवसेनेनं छुपा पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेशदादा जैन यांनी उघडपणे मनिष जैन यांना पाठिंबा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 02:04 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close