S M L

आता कलमाडींचा नंबर ?

30 नोव्हेंबरसुरेश कलमाडींभोवतीचा फास आवळायला आता सीबीआयने सुरवात केली आहे. त्यांच्या विश्वासातल्या चार सहका-यांच्या घरांवर आज छापे टाकण्यात आले. त्यात कलमाडींच्या पुण्यातल्या विश्वासू संगीत वेलिणकरांचाही समावेश आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आता लवकरच सुरेश कलमाडींची चौकशी होण्याची आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. ललित भानोत कॉमनवेल्थ आयोजन समितीचे सरचिटणीस, व्ही के वर्मा आयोजन समितीचे डायरेक्टर जनरल, आर के संचेती आयोजन समितीचे जॉइंट डायरेक्टर जनरल आणि संगीता वेलिणकर आयोजन समितीच्या अतिरिक्त डायरेक्टर जनरल आणि सुरेश कलमाडींच्या निकटवर्तीय. कॉमनवेल्थ समितीमधल्या या चार वरिष्ठ अधिका-यांच्या दिल्लीतल्या घरांवर सीबीआयने छापे टाकले. खेळांच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या स्टॉप वॉचेसच्या खरेदीत 107 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यासंबंधात माहिती गोळा करण्यासाठी हे छापे टाकले गेले. आपण निरपराध असून सीबीआयला सहकार्य करू असं ललित भानोत यांनी म्हटलं आहे. सर्व निर्णय घेताना आपण वरिष्ठांना विश्वासात घेतलं होतं, असंही भानोत म्हणतात. त्यांचा संकेत कलमाडींकडे आहे. त्यातच कलमाडींच्या पुण्यातल्या निकटवर्तीय संगीता वेलिणकर यांच्या घरावरही छापा पडल्याने आता सुरेश कलमाडींची चौकशी होणं निश्चित मानलं जातं आहे. - संगीता वेलिणकर यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रं असल्याचा सीबीआयला संशय आहे- वेलिणकरांच्या भारतात आणि भारताबाहेरच्या दौ-यांचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे- जाहिराती देण्यात आणि व्हीडिओ स्क्रीन्स लावण्यात वेलिणकरांनी जी भूमिका निभावली, त्याचीही माहिती मागण्यात आली आहे.- संगीता वेलिणकरांचा आयोजन समितीत किती दबदबा होता, याविषयी माहिती मिळवण्यासाठी आयोजन समितीच्या सर्व बैठकांचे मिनिट्स मागवण्यात आले आहे.चीनमधून परतल्यानंतर अवघ्या 48 तासांत कलमाडींच्या आयोजन समितीवर 11 छापे टाकण्यात आले. टाइम स्कोअर बोर्ड प्रकरणी भानोत आणि वर्मांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वीच लंडनमधल्या बॅटन रिले घोटाळ्यात दरबारी आणि महेंद्रू हे कलमाडींचे इतर दोन सहकारी जेलमध्ये आहेत. आपण चौकशीसाठी तयार आहोत. असं कलमाडी म्हणत असले तरी अजून पर्यंत सीबीआयचे हात त्यांच्यापर्यंत का पोचले नाहीत हाच खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 04:36 PM IST

आता कलमाडींचा नंबर ?

30 नोव्हेंबर

सुरेश कलमाडींभोवतीचा फास आवळायला आता सीबीआयने सुरवात केली आहे. त्यांच्या विश्वासातल्या चार सहका-यांच्या घरांवर आज छापे टाकण्यात आले. त्यात कलमाडींच्या पुण्यातल्या विश्वासू संगीत वेलिणकरांचाही समावेश आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आता लवकरच सुरेश कलमाडींची चौकशी होण्याची आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

ललित भानोत कॉमनवेल्थ आयोजन समितीचे सरचिटणीस, व्ही के वर्मा आयोजन समितीचे डायरेक्टर जनरल, आर के संचेती आयोजन समितीचे जॉइंट डायरेक्टर जनरल आणि संगीता वेलिणकर आयोजन समितीच्या अतिरिक्त डायरेक्टर जनरल आणि सुरेश कलमाडींच्या निकटवर्तीय.

कॉमनवेल्थ समितीमधल्या या चार वरिष्ठ अधिका-यांच्या दिल्लीतल्या घरांवर सीबीआयने छापे टाकले. खेळांच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या स्टॉप वॉचेसच्या खरेदीत 107 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यासंबंधात माहिती गोळा करण्यासाठी हे छापे टाकले गेले. आपण निरपराध असून सीबीआयला सहकार्य करू असं ललित भानोत यांनी म्हटलं आहे.

सर्व निर्णय घेताना आपण वरिष्ठांना विश्वासात घेतलं होतं, असंही भानोत म्हणतात. त्यांचा संकेत कलमाडींकडे आहे. त्यातच कलमाडींच्या पुण्यातल्या निकटवर्तीय संगीता वेलिणकर यांच्या घरावरही छापा पडल्याने आता सुरेश कलमाडींची चौकशी होणं निश्चित मानलं जातं आहे.

- संगीता वेलिणकर यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रं असल्याचा सीबीआयला संशय आहे- वेलिणकरांच्या भारतात आणि भारताबाहेरच्या दौ-यांचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे- जाहिराती देण्यात आणि व्हीडिओ स्क्रीन्स लावण्यात वेलिणकरांनी जी भूमिका निभावली, त्याचीही माहिती मागण्यात आली आहे.- संगीता वेलिणकरांचा आयोजन समितीत किती दबदबा होता, याविषयी माहिती मिळवण्यासाठी आयोजन समितीच्या सर्व बैठकांचे मिनिट्स मागवण्यात आले आहे.

चीनमधून परतल्यानंतर अवघ्या 48 तासांत कलमाडींच्या आयोजन समितीवर 11 छापे टाकण्यात आले. टाइम स्कोअर बोर्ड प्रकरणी भानोत आणि वर्मांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वीच लंडनमधल्या बॅटन रिले घोटाळ्यात दरबारी आणि महेंद्रू हे कलमाडींचे इतर दोन सहकारी जेलमध्ये आहेत. आपण चौकशीसाठी तयार आहोत. असं कलमाडी म्हणत असले तरी अजून पर्यंत सीबीआयचे हात त्यांच्यापर्यंत का पोचले नाहीत हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close