S M L

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत विक्रम काळे विजयी

30 नोव्हेंबरमराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या पसंतीच्या मतांत मुंसडी मारत आमदार काळे यांनी सहजरित्या निवडणूक जिंकली. शिक्षक संघटनेचे उमेदवार पी एस घाडगे यांचा त्यांनी पराभव केला. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या विक्रम काळे यांनी पहिल्या फेरीत एकवीस हजार दोनशे नऊ मत मिळवली. एकूण 45 हजार 256 मतदारांनी मतदान केले होते. मात्र शिक्षक संघटनेच्या निवडणूकीतही एक हजार 46 मतं बाद ठरली. त्यामुळे वैध मतांच्या पन्नास टक्के आणि आदिक एक म्हणजे 22हजार 209 मतांचा कोटा विजयासाठी ठरविण्यात आला. त्यापैकी एकवीस हजार दोनशे नऊ मतं तर काळे यांना पहिल्या पसंतीची मिळाली होती. त्यामुळं दुसर्‍या पसंंतीची नऊशे चार मत मिळवून ते विजयी ठरले. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी रमेश पोकळे यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. पण पोकळे यांना तिसर्‍या क्रमाकांवर समाधान मानाव लागलं. विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 05:00 PM IST

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत विक्रम काळे विजयी

30 नोव्हेंबर

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या पसंतीच्या मतांत मुंसडी मारत आमदार काळे यांनी सहजरित्या निवडणूक जिंकली. शिक्षक संघटनेचे उमेदवार पी एस घाडगे यांचा त्यांनी पराभव केला.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या विक्रम काळे यांनी पहिल्या फेरीत एकवीस हजार दोनशे नऊ मत मिळवली. एकूण 45 हजार 256 मतदारांनी मतदान केले होते. मात्र शिक्षक संघटनेच्या निवडणूकीतही एक हजार 46 मतं बाद ठरली. त्यामुळे वैध मतांच्या पन्नास टक्के आणि आदिक एक म्हणजे 22हजार 209 मतांचा कोटा विजयासाठी ठरविण्यात आला.

त्यापैकी एकवीस हजार दोनशे नऊ मतं तर काळे यांना पहिल्या पसंतीची मिळाली होती. त्यामुळं दुसर्‍या पसंंतीची नऊशे चार मत मिळवून ते विजयी ठरले. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी रमेश पोकळे यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. पण पोकळे यांना तिसर्‍या क्रमाकांवर समाधान मानाव लागलं. विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close