S M L

अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात

01 डिसेंबरओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संजय राठोड यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी ठेवला. अध्यक्षांनी निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला. संजय राठोड यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. शिवसेनेचे दोन आमदार अभिजीत अडसूळ आणि शरद पाटील यांच्यावर अजूनपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे. विधानसभा पाठोपाठ विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी स्थगीत झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी परिषदेतही जोरदार गोंधळा घातला आहे. काही झालं तरी शेतकर्‍यांचा प्रश्न अधिवेशनात लावूनच धरणार असा निर्धार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.राज्यघटना पायदळी तुडवली विधानसभेत गोंधळ करताना शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळातील राजदंड फेकून देण्याचा प्रयत्न केला. तर विधिमंडळ सचिवांच्या समोर असलेली राज्यघटना काहींनी पायदळी तुडवली. त्यालाही हात लावला. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सविस्तर अहवाल आल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि इतरांवर कारवाई करण्याचा विचार केला जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 12:32 PM IST

अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात

01 डिसेंबर

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संजय राठोड यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी ठेवला. अध्यक्षांनी निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला. संजय राठोड यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. शिवसेनेचे दोन आमदार अभिजीत अडसूळ आणि शरद पाटील यांच्यावर अजूनपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे.

विधानसभा पाठोपाठ विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी स्थगीत झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी परिषदेतही जोरदार गोंधळा घातला आहे. काही झालं तरी शेतकर्‍यांचा प्रश्न अधिवेशनात लावूनच धरणार असा निर्धार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

राज्यघटना पायदळी तुडवली

विधानसभेत गोंधळ करताना शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळातील राजदंड फेकून देण्याचा प्रयत्न केला. तर विधिमंडळ सचिवांच्या समोर असलेली राज्यघटना काहींनी पायदळी तुडवली. त्यालाही हात लावला. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सविस्तर अहवाल आल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि इतरांवर कारवाई करण्याचा विचार केला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close