S M L

विदर्भ संग्राम समितीच्या विदर्भ बंदला अत्यल्प प्रतिसाद

01 डिसेंबरविदर्भ संग्राम समितीने आज (बुधवारी) पुकारलेल्या बंदला फारसा प्रतिसाद दिसून आलेला नाही. काही ठिकाणी दुकानं बंद आहेत पण तेवढा अपवाद वगळता बाजारपेठ मात्र सुरु आहेत. शहर वाहतूक बसेस आणि ऑटोरिक्षा सेवासुद्धा नेहमीप्रमाणे सुरु आहेत. संग्राम समितीचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी ठिकठिकाणी जाऊन बंदचं आवाहन केलं पण त्यांच्या बंदच्या हाकेला लोकांनी साथ दिलेली दिसत नाही. धोटे आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा आज नागपूरच्या लोकमत चौकात जाळला. जांबुवंतराव धोटे आणि जोगेंद्र कवाडे यांना पोलिसांनी अटक केली. शहिद चौकातून त्यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 12:44 PM IST

विदर्भ संग्राम समितीच्या विदर्भ बंदला अत्यल्प प्रतिसाद

01 डिसेंबर

विदर्भ संग्राम समितीने आज (बुधवारी) पुकारलेल्या बंदला फारसा प्रतिसाद दिसून आलेला नाही. काही ठिकाणी दुकानं बंद आहेत पण तेवढा अपवाद वगळता बाजारपेठ मात्र सुरु आहेत. शहर वाहतूक बसेस आणि ऑटोरिक्षा सेवासुद्धा नेहमीप्रमाणे सुरु आहेत. संग्राम समितीचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी ठिकठिकाणी जाऊन बंदचं आवाहन केलं पण त्यांच्या बंदच्या हाकेला लोकांनी साथ दिलेली दिसत नाही. धोटे आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा आज नागपूरच्या लोकमत चौकात जाळला. जांबुवंतराव धोटे आणि जोगेंद्र कवाडे यांना पोलिसांनी अटक केली. शहिद चौकातून त्यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close