S M L

सलग 15 व्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प

02 डिसेंबरसलग 15 व्या दिवशीही जेपीसी चौकशीच्या मागणीवरुन संसदेचे कामकाज झालं नाही. विरोधकांच्या गदारोळातच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 45 हजार कोटी रुपयांचे रेल्वे पुरवणी मागणी विधेयक लोकसभेपुढे ठेवले. हे विधेयक आवाजी मतदानाद्वारे पारीतही करण्यात आले. कोणत्याही चर्चेशिवाय विधेयक मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत सत्ताधार्‍यांनी 15 मिनीटं कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 11:58 AM IST

सलग 15 व्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प

02 डिसेंबर

सलग 15 व्या दिवशीही जेपीसी चौकशीच्या मागणीवरुन संसदेचे कामकाज झालं नाही. विरोधकांच्या गदारोळातच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 45 हजार कोटी रुपयांचे रेल्वे पुरवणी मागणी विधेयक लोकसभेपुढे ठेवले. हे विधेयक आवाजी मतदानाद्वारे पारीतही करण्यात आले. कोणत्याही चर्चेशिवाय विधेयक मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत सत्ताधार्‍यांनी 15 मिनीटं कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close