S M L

या प्रकरणी आपल्याला जबाबदार धरु नये - पुराणिक

02 डिसेंबरबेस्टच्या वीज मीटर खरेदी आणि वीज बिलांमध्ये 5 कोटी 66 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या पुराणिक यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. आयबीएन लोकमतने सातत्याने या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर पुराणिक यांना हा खुलासा करावा लागला. मीटर खरेदीचा निर्णय हा समितीने घ्यायचा निर्णय असतो अशा वेळी एकट्या व्यक्तीला जबाबदार धरणं योग्य नसल्याचंही पुराणिक यांच म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांची साठ लाख रुपयांची विजेची बिलं कमी केल्याचा पुराणिक यांच्यावर आरोप आहे. मात्र विजेची बीलं कमी करण्यासाठी तीन जणांची समिती गठित केली असल्यानं या प्रकरणी आपल्याला जबाबदार धरु नये असं पुराणिक यांना वाटतं. मात्र या प्रकरणी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये पुराणिक यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली असुन या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 12:49 PM IST

या प्रकरणी आपल्याला जबाबदार धरु नये - पुराणिक

02 डिसेंबर

बेस्टच्या वीज मीटर खरेदी आणि वीज बिलांमध्ये 5 कोटी 66 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या पुराणिक यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. आयबीएन लोकमतने सातत्याने या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर पुराणिक यांना हा खुलासा करावा लागला. मीटर खरेदीचा निर्णय हा समितीने घ्यायचा निर्णय असतो अशा वेळी एकट्या व्यक्तीला जबाबदार धरणं योग्य नसल्याचंही पुराणिक यांच म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांची साठ लाख रुपयांची विजेची बिलं कमी केल्याचा पुराणिक यांच्यावर आरोप आहे. मात्र विजेची बीलं कमी करण्यासाठी तीन जणांची समिती गठित केली असल्यानं या प्रकरणी आपल्याला जबाबदार धरु नये असं पुराणिक यांना वाटतं. मात्र या प्रकरणी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये पुराणिक यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली असुन या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close