S M L

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका उद्धव ठाकरेंचा इशारा

03 डिसेंबरसरकारला फक्त चर्चा करण्यात रस आहे काय असा सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. शिनसेनेचे आमदार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले. आधी झालेल्या चर्चांच काय झालं असंही उद्धवनी यावेळी सरकारला विचारला. तसेच चर्चेमध्ये जे मुद्दे मांडले आहेत त्यावर अंमलबजावणी व्हावी असा आमचा आग्रह आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अधिवेशनादरम्यान आमचे आमदार आक्रमक राहणार आहेत.असंही उद्धव यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या निलंबनावरून आता सरकार आणि विरोधक असा सामाना रंगणार असं दिसत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज विधान भवनात सेना आमदारांची बैठक घेतली. सरकार आमदारांना बोलू देत नसेल तोंडाला काळे फडके बांधुन ते सभागृहात जातील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनेचे पाच आमदारांचे निलंबन झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी तोंडाला काळे फडके बांधून निषेध आंदोलन केलं. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 08:58 AM IST

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका उद्धव ठाकरेंचा इशारा

03 डिसेंबर

सरकारला फक्त चर्चा करण्यात रस आहे काय असा सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. शिनसेनेचे आमदार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले. आधी झालेल्या चर्चांच काय झालं असंही उद्धवनी यावेळी सरकारला विचारला. तसेच चर्चेमध्ये जे मुद्दे मांडले आहेत त्यावर अंमलबजावणी व्हावी असा आमचा आग्रह आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अधिवेशनादरम्यान आमचे आमदार आक्रमक राहणार आहेत.असंही उद्धव यांनी म्हटले आहे.

त्यामुळे शिवसेना आमदारांच्या निलंबनावरून आता सरकार आणि विरोधक असा सामाना रंगणार असं दिसत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज विधान भवनात सेना आमदारांची बैठक घेतली. सरकार आमदारांना बोलू देत नसेल तोंडाला काळे फडके बांधुन ते सभागृहात जातील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनेचे पाच आमदारांचे निलंबन झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी तोंडाला काळे फडके बांधून निषेध आंदोलन केलं. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 08:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close