S M L

मराठवाड्यातील 29 साखर कारखाने बंद

संजय वरकड, औरंगाबाद 03 डिसेंबरआजारी साखर कारखाने, अवकाळी पाऊस आणि ऊसतोड कामगार मिळत नसल्यानं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये याही हंगामात पाणी आणलं आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील शिल्लक ऊस जाळण्याच्या किंवा जनावरांना चारा म्हणून विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. यावेळीही अनेक भागात तेच चित्र आहे. मराठवाड्यातील तब्बल 29 साखर कारखाने बंद असून त्यांना सुरू करण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही.राज्यभरात या हंगामात तब्बल नऊशे लाख टन ऊस शेतात उभा आहे. राज्यातले सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालले तरी दोनशे लाख टन ऊस शिल्लक राहण्याची चिन्ह आहेत. त्यातच 65 साखर कारखाने बंद असल्याने त्यात आणखी शंभर लाख टन उसाची भर पडण्याची शक्यता आहे. या पासष्टपैकी 44 कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी प्रयत्न झालेत, पण त्यात म्हणावे तसं यश आलेलं नाही. मराठवाड्यात त्यापैकी 29 साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यात किमान 120 लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे.ऊसतोड कामगारांनी प्रतिटन दोनशे रूपये दर द्यावा अशी मागणी केली होती. ती मान्य न झाल्यानं अनेक कामगार परराज्यात गेलेत किंवा ऊसतोडीला येत नाहीत. त्यामुळे उसाच्या गळीत हंगामालाच घरघर लागली आहे. यावर तोडगा काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले पण प्रत्यक्षात परिस्थिती चिंताजनक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 04:12 PM IST

मराठवाड्यातील 29 साखर कारखाने बंद

संजय वरकड, औरंगाबाद

03 डिसेंबर

आजारी साखर कारखाने, अवकाळी पाऊस आणि ऊसतोड कामगार मिळत नसल्यानं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये याही हंगामात पाणी आणलं आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील शिल्लक ऊस जाळण्याच्या किंवा जनावरांना चारा म्हणून विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. यावेळीही अनेक भागात तेच चित्र आहे. मराठवाड्यातील तब्बल 29 साखर कारखाने बंद असून त्यांना सुरू करण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही.

राज्यभरात या हंगामात तब्बल नऊशे लाख टन ऊस शेतात उभा आहे. राज्यातले सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालले तरी दोनशे लाख टन ऊस शिल्लक राहण्याची चिन्ह आहेत. त्यातच 65 साखर कारखाने बंद असल्याने त्यात आणखी शंभर लाख टन उसाची भर पडण्याची शक्यता आहे. या पासष्टपैकी 44 कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी प्रयत्न झालेत, पण त्यात म्हणावे तसं यश आलेलं नाही. मराठवाड्यात त्यापैकी 29 साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यात किमान 120 लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे.

ऊसतोड कामगारांनी प्रतिटन दोनशे रूपये दर द्यावा अशी मागणी केली होती. ती मान्य न झाल्यानं अनेक कामगार परराज्यात गेलेत किंवा ऊसतोडीला येत नाहीत. त्यामुळे उसाच्या गळीत हंगामालाच घरघर लागली आहे. यावर तोडगा काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले पण प्रत्यक्षात परिस्थिती चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close