S M L

मुख्य दक्षता आयुक्त थॉमस राजीनामा देण्याची शक्यता

03 डिसेंबर2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारनं आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले. अनेक आरोप असलेले मुख्य दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस अखेर राजीनामा देण्याची शक्यता आहे. थॉमस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 जी घोटाळा आणि केरळमधल्या पामोलिन तेल आयात प्रकरणात थॉमस यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे ते 2 जी घोटाळ्याची चौकशी कशी करू शकतात असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला होता. त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढूनही सरकार त्यांना हटवायला सरकार टाळाटाळ करत होतं.दरम्यान, 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज सलग 16 व्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. पण घटनात्मक पेच टाळण्यासाठी या गोंधळातच सरकारने काही मदत्त्वाची कामं आजही रेटून नेली. घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. दोन्ही सभागृहांंचं कामकाज आज दोनवेळा तहकूब झालं. पण मोठ्या गदारोळातच सराकरनं काही विधेयक सादर केली. रेल्वे अप्रोप्रिएशन विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं. कालही सरकारनं काही विधेयक मांडली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 05:39 PM IST

मुख्य दक्षता आयुक्त थॉमस राजीनामा देण्याची शक्यता

03 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारनं आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले. अनेक आरोप असलेले मुख्य दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस अखेर राजीनामा देण्याची शक्यता आहे. थॉमस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 जी घोटाळा आणि केरळमधल्या पामोलिन तेल आयात प्रकरणात थॉमस यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे ते 2 जी घोटाळ्याची चौकशी कशी करू शकतात असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला होता. त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढूनही सरकार त्यांना हटवायला सरकार टाळाटाळ करत होतं.

दरम्यान, 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज सलग 16 व्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. पण घटनात्मक पेच टाळण्यासाठी या गोंधळातच सरकारने काही मदत्त्वाची कामं आजही रेटून नेली. घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. दोन्ही सभागृहांंचं कामकाज आज दोनवेळा तहकूब झालं. पण मोठ्या गदारोळातच सराकरनं काही विधेयक सादर केली. रेल्वे अप्रोप्रिएशन विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं. कालही सरकारनं काही विधेयक मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close